Home Breaking News *भारताने पहिल्या टी -ट्वेंटी सामनात बेधडक कामागिरी केल्यामुळे दिलासादायक सुरवात……..*

*भारताने पहिल्या टी -ट्वेंटी सामनात बेधडक कामागिरी केल्यामुळे दिलासादायक सुरवात……..*

विशाखापट्टणम येथे 23 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी ट्वेंटी सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव ह्याची बेधडक खेळी आणि त्याच्या सोबत मोलाचे योगदान देणारे ईशान किशन आणि रिंकू सिंग ह्यांनी साथ देत विजयाच्या वाटेत धावा करत निर्णायक योगदान दिले. ह्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत जॉश इंग्लिसने पन्नास चेंडूत एकशे दहा धावांची तडफदार खेळी करत भारता पुढे 208 धावांचे आव्हान उभे केले होते, परंतु सूर्यकुमारच्या 42 चेंडूत 80 धावांच्या खेळपुढे धावसंख्या चा पाठलाग कमी पडला असे जाणवले , इकडे सूर्याकुमार धडाकेबाज फलंदाजी करत असताना त्याला ईशान किशन ने 39 चेंडूत 58 धावा व रिंकू सिंग ने 14 चेंडूत 22 धावांचे योगदान विजय मिळण्यासाठी सार्थक ठरले. द्विशतकीय आव्हान असल्यामुळे नवीन खेळाडूंवर खरतर खूप दडपणाची स्थिती होती पण शांतपणे आणि संयमाने धोरण ठेऊन हे आव्हान पार करायचे असा चंग बांधून बेधडक खेळी करत मालिकेतील पहिला विजयी रथ आपल्या पथ्यावर पाडण्याचे काम भारताने केला आहे.