दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशीचे लग्नाचे, 24 नोव्हेंबर म्हणजे शुक्रवार पासून तुळशी विवाह ला सुरवात होत असून 27 नोव्हेंबर पर्यंत करण्याची परंपरा असलेल्यानी आपल्या सोयीनी करावे. त्यानंतर तुळशी विवाह होताच सनई चौघडे वाजत गाजत इच्छुक जोडपं्यांचे लग्नासराई साठी प्रारंभ सुरु होईल. चातुर्मास समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होणार आहेत ते जुलै 2024 पर्यंत तिथी प्रमाणे करता येईल. यंदाच्या अधिक महिन्यामुळे लग्नाचे मुहूर्त पुढे सरकले असले तरी संपूर्ण मोसमत शुभमंगल करण्यासाठी एकूण सत्याआयेंशी मुहूर्त आहेत. ह्या शुभमंगल प्रसंगी बाजार पेठात खरेदी साठी लगबग सुरु झाली असून त्यासाठी मंगल कार्यालय व्यावसायिक , वाजंत्री, केटरिंग व्यवसाय, डेकोरेशन व्यवसाय, कपडे खरेदी व्यवसाय, घोडे, दिवे व्यवसाईक व इतर सर्व ह्यांची ह्या मुहूर्त मुळे मौसम लाभदायक जावो. आणि सगळ्यात महत्वाचे असे कि जुलै महिन्यात सर्वाधिक चौदा विवाह मुहूर्त आहेत.