सदरचे खडक पोलीस स्टेशन हदीतील अट्टल गुन्हेगार, दहशत निर्माण करणारा अरॊपी नजीर सलीम शेख (वय – 29 वर्ष रा – कशीवाडी, भवानी पेठ, हनुमान मंदिराजवळ, पुणे ) ह्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हेगार आरोपी नजीर सलीम शेख ह्याच्यावर घातक प्रकारचे हत्यार बाळगणे, धमकी देणे, उद्योजक व व्यापारी लोकांना खंडणी मागणे, सामान्य नागरिकांना धमकावणे व त्यांना मारहाण करणे , मारामारी करणे, ह्या सारखे गंभीर प्रकारचे गुन्हे केले असून त्याच्या ह्या गुन्हेगारी प्रवृतीला आळा बसण्यासाठी त्याला सन 2023 साली दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते असे असताना देखील त्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत राहिला. त्यामुळे खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील माने ह्यांनी आरोपी नजीर सलीम शेख ह्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार ह्या