राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार ह्यांच्या कुटुंबीयांनी गोविंद बाग येथे दिवाळी पाडवा साजरा केला. यावेळी सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे अजित पवारांच्या ह्यांच्या उपस्थितीवर. अखेर अजित दादा तिथं आले आणि त्यांनी या क्षणांचा आनंद घेतला. बुधवारी (ता. १५) भाऊबीजनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी दाखल झाले होते. बंधू अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी औक्षण केले. तसेच सुनेत्रा पवार वाहिनी यांनी दिलेल्या साडीबद्दल सुप्रिया सुळे यांनी समाजमाध्यमा समोर आभार मानले. दिवाळी पाडव्यानिमित्त काल उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथेप्रमाणे गोविंद बागेत हजेरी लावली होती.राजकीयदृष्ट्या मतभेद झाले तरी दिवाळी सणाला पवार कुटुंब एकत्र आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलाच दिवाळी उत्सव साजरा होत आहे. शरद पवार ह्यांनी ह्या प्रसंगी माध्यमांसमोर पक्षीय फूट व अजित पवार गटाबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. या दिवाळी उत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील थेट माध्यमांसमोर येणे टाळले. दरम्यान, भाऊबीज निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व बहिणींनी अजित पवार यांच्या पाठोपाठ यांचे बंधू श्रीनिवास पवार, उद्योजक रणजीत पवार , जयंत पवार यांना सर्व बहिणींनी मिळून औक्षण केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवत बुधवारी पवार कुटुंबियांनी काटेवाडीमध्ये भाऊबीज सणानिमित्त एकत्र येत सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे आणि सर्व बहिणींनी औक्षण केलं.