Home Advertisement पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक बंदोबस्त; १७ मुख्य रस्ते बंद, पर्यायी मार्ग...

पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक बंदोबस्त; १७ मुख्य रस्ते बंद, पर्यायी मार्ग आणि पार्किंग सुविधा.

61
0

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पुणे शहरात वाहतुकीचे नियोजन बदलले जाणार आहे. मिरवणुकीदरम्यान शहरातील १७ मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जातील, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी दिली. मिरवणूक संपल्यानंतर हे रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले जातील.

गणेश विसर्जन मिरवणूक १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक मिरवणुकीसाठी जमणार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. शहर वाहतूक प्रशासनाने पार्किंगबाबतही सूचना दिल्या आहेत.

बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग:

  • लक्ष्मी रोड, छत्रपती शिवाजी रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, भांडारकर रोड, पुणे-सातारा रोड, सोलापूर रोड, प्रभात रोड, बागडे रोड आणि गुरु नानक रोड या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बंद राहील.
  • या रस्त्यांवर मिरवणूक सुरू असताना पार्किंगला मनाई आहे. खंडोजीबाबा चौक ते वैषाली हॉटेल चौक परिसरातील रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी असेल.

पार्किंग बंद आणि जड वाहनांवर ४८ तासांची बंदी:
सोमवार मध्यरात्रीपासून सुरू होऊन बुधवारी मध्यरात्रीपर्यंत जड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडेल.

याशिवाय, नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व नागरिकांना वाहतूक शाखेकडून कळविण्यात येते की गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कृपया रिंग रोड चा वापर करावा… 

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. १७ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजल्यापासून १८ सप्टेंबरपर्यंत शहरातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या रस्त्यांवर मिरवणूक संपेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

बंद होणारे प्रमुख रस्ते पुढीलप्रमाणे आहेत:

  • शिवाजी रोड: काकासाहेब गाडगीळ पुतळ्यापासून जेडे चौकापर्यंतचा रस्ता १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून बंद राहील.
  • लक्ष्मी रोड: संत कबीर चौकीपासून अलका टॉकीज चौकापर्यंतचा रस्ता सकाळी ७ वाजल्यापासून बंद राहील.
  • बाजीराव रोड: बाजाज पुतळ्यापासून फुतका बुज चौकापर्यंतचा रस्ता दुपारी १२ वाजल्यापासून बंद राहील.
  • कुमठेकर रोड: टिळक चौकापासून चितळे कॉर्नर चौकापर्यंतचा रस्ता दुपारी १२ वाजल्यापासून बंद राहील.
  • गणेश रोड: दरुवाला ब्रिजपासून जिजामाता चौकापर्यंत सकाळी १० वाजल्यापासून बंद राहील.
  • केळकर रोड: बुधवार चौकापासून अलका टॉकीज चौकापर्यंत सकाळी १० वाजल्यापासून बंद राहील.
  • टिळक रोड: जेडे चौकापासून टिळक चौकापर्यंत सकाळी ९ वाजल्यापासून बंद राहील.
  • शास्त्री रोड: सेनादत्ता चौकीपासून अलका टॉकीज चौकापर्यंत दुपारी १२ वाजल्यापासून बंद राहील.
  • जंगली महाराज रोड: झांशी राणी चौकापासून खंडोजीबाबा चौकापर्यंत सायंकाळी ४ वाजल्यापासून बंद राहील.
  • कर्वे रोड: नळ स्टॉप चौकापासून खंडोजीबाबा चौकापर्यंत सायंकाळी ४ वाजल्यापासून बंद राहील.
  • फर्ग्युसन रोड: खंडोजीबाबा चौकापासून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य गेटपर्यंत सायंकाळी ४ वाजल्यापासून बंद राहील.
  • भंडारकर रोड: पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक या मार्गावर सायंकाळी ४ वाजल्यापासून बंद राहील.
  • पुणे-सातारा रोड: वोल्गा चौकापासून जेडे चौकापर्यंत रस्ता १७ सप्टेंबर संध्याकाळी ४ वाजल्यापासून बंद राहील.
  • सोलापूर रोड: सेव्हन लव्ह्स चौकापासून जेडे चौकापर्यंत सायंकाळी ४ वाजल्यापासून बंद राहील.
  • प्रभात रोड: डेक्कन पोलीस स्टेशनपासून शेलार मामा चौकापर्यंत सायंकाळी ४ वाजल्यापासून बंद राहील.
  • बगडे रोड: सोन्या मारुती चौकापासून फडके हौद चौकापर्यंत सकाळी ९ वाजल्यापासून बंद राहील.
  • गुरु नानक रोड: देवजी बाबा चौक ते गोविंद हलवाई चौकापर्यंत रस्ता सकाळी ९ वाजल्यापासून बंद राहील.

शहरातील नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात विविध ठिकाणी वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या नियोजित वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दोन आणि चार चाकी वाहनांसाठी उपलब्ध असलेले पार्किंग स्पॉट्स पुढीलप्रमाणे आहेत:

  • न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड)
  • शिवाजी आखाडा पार्किंग रोड
  • देशाई कॉलेज (पोलीस वाहनांसाठी राखीव)
  • हमालवाडा (पत्र्या मारुती चौक रोड)
  • गोगटे शाळा

याशिवाय एसपी कॉलेज, भिडे ब्रिज ते गाडगीळ ब्रिज नदीकाठ, पेशवे रोड, आणि रानडे रोड येथे देखील पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.

चार चाकी वाहनांसाठी पीएमपीएमएल मैदान (पुरम चौक), तर दोन चाकी वाहनांसाठी पेशवे पार्क सरसबाग, हरजीवन हॉस्पिटल (सावरकर चौक), पाटील पार्किंग प्लाझा, काँग्रेस हाऊस रोड, पर्वती ते दांडेकर ब्रिज आणि निलायम टॉकीज येथे पार्किंग सुविधा उपलब्ध आहेत.

अतिरिक्त पार्किंग ठिकाणांमध्ये विमलबाई गरवारे हायस्कूल, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, आपटे प्रशाला, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान, मराठवाडा कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल (रामानबाग) आणि सीओईपी मैदान यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी दोन किंवा चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे.

नागरिकांनी नियोजित पार्किंग स्पॉट्सचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गणेशउत्सव 2024 कालावधीमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी दिनांक 17.09.2024. उपलब्ध असणारे पार्किंगबाबत.