Home Breaking News कोंढव्यात गोळीबाराची घटना; बिल्डिंग मटेरियल पुरवठादार गंभीर जखमी, तीन आरोपी अटकेत.

कोंढव्यात गोळीबाराची घटना; बिल्डिंग मटेरियल पुरवठादार गंभीर जखमी, तीन आरोपी अटकेत.

107
0

कोंढव्यातील छोडिया कॉर्नर समोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दिलीप गायकवाड, बिल्डिंग मटेरियल पुरवठादार, गंभीर जखमी झाले आहेत. गायकवाड यांच्या पोटात आणि मांडीवर दोन गोळ्या लागल्याची माहिती मिळाली आहे.

सुरुवातीच्या माहितीनुसार, या गोळीबाराचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, १५ दिवसांपूर्वी गायकवाड यांनी एका मटेरियल पुरवठादाराच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर वाद झाल्याचे समजते. या घटनेचा संबंध त्या वादाशी असू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. बाबुल सय्यद, तनमय सखाराम भूसारे आणि आकाश अरुण जगताप अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. गायकवाड यांच्या जखमी अवस्थेत उपचार सुरू असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.