राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक : जनहिताचे अनेक निर्णय जाहीर
आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नागरिकांच्या कल्याणाशी थेट संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विकास, रोजगार, शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात ठोस निर्णय घेण्यात आले. बैठकीत प्रमुखतः ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकऱ्यांसाठी नव्या योजना लागू करणे आणि नागरी भागातील पायाभूत सुविधांसाठी निधी वाढविण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षेसाठी...
जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोषपूर्ण इम्प्लांटसाठी पुणेतील व्यावसायिकाला NCDRC कडून ₹३५ लाखांची भरपाई.
पुण्यातील व्यावसायिक पुरुषोत्तम लोहिया यांना जॉन्सन अँड जॉन्सनच्या दोषपूर्ण वैद्यकीय इम्प्लांटमुळे सहन कराव्या लागलेल्या शारीरिक व मानसिक त्रासासाठी सात वर्षांच्या न्यायलयीन संघर्षानंतर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) ₹३५ लाखांची भरपाई मंजूर केली आहे. लोहिया यांनी दोषपूर्ण ASR XL फेमोरल इम्प्लांटमुळे झालेल्या नुकसानासाठी ₹५ कोटींचा दावा दाखल केला होता. NCDRC ने ₹३५ लाखांची भरपाई, तसेच मानसिक त्रासासाठी ₹१ लाख मंजूर...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे परिवर्तनाचे ठाम आवाहन
पिंपरी–चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ (क) मध्ये प्रचाराला वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून नागरिकांना परिवर्तनाचा संदेश दिला. “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक शिक्षित महिला, कायद्याची जाण असलेली वकील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उभी राहणारी कार्यकर्ती,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेची ठाम...
पुण्यात मोठी कारवाई! बनावट जामीनदार आणि वकिलांचे रॅकेट उध्वस्त, पोलिसांचा मोठा डाव यशस्वी
🔹 गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचे रॅकेट सक्रिय 🔹 वानवडी पोलिसांची सापळा रचून कारवाई, ९ जणांना अटक 🔹 ९५ संशयित रेशनकार्ड, आधारकार्ड आणि मोठ्या प्रमाणात बनावट दस्तऐवज जप्त पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी जगतातील मोठा कट उध्वस्त करत वानवडी पोलिसांनी बनावट जामीनदारांचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. हे रॅकेट काही वकिलांच्या मदतीने गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत होते....
“मॅकॉलेने विचारसरणी गुलाम केली; आता मानसिक स्वातंत्र्याची वेळ” – भारतीय शिक्षणव्यवस्थेबाबत PM मोदींची ठाम भूमिका
भारताच्या शिक्षण व्यवस्थेत एक मोठा धोरणात्मक बदल घडवण्याचा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा थॉमस मॅकॉलेच्या शिक्षण धोरणावर जोरदार टीका केली आहे. “मॅकॉलेने भारतीयांची विचारसरणी गुलाम करण्याचा प्रयत्न केला. त्याने तयार केलेली शिक्षण प्रणाली मनावर बंधने घालणारी होती. आता भारताला मन, बुद्धी आणि विचारांनी स्वतंत्र होण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने देशभरात नवीन चर्चा...
महाराष्ट्राच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात भव्य ध्वजारोहण समारंभ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी पुणे शहरात अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध अशा ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर सकाळी ८ वाजता हा समारंभ पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या राष्ट्रभक्तिपूर्ण सोहळ्याला पुणे...
कात्रज परिसरात १७ एप्रिलला पाणीपुरवठा बंद; महत्त्वाच्या पाईपलाइनच्या दुरुस्तीमुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा – पुणे मनपाचा इशारा
पुणे : पुणे शहरातील कात्रज आणि परिसरातील नागरिकांना १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. पुणे महापालिकेच्या जलविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगम मंदिराजवळील मोठ्या दाबाच्या पाईपलाइनमध्ये गळती आढळल्यामुळे त्या ठिकाणी अत्यावश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याचबरोबर राजमाता सबवेच्या परिसरातही संरचनात्मक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होणार आहे. महापालिकेच्या जलविभागाने सांगितले की, १८ एप्रिल रोजी...
पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी करणारे दोघे आरोपी पोलीसांच्या ताब्यात
पुणे शहरातील लोहमार्ग पोलीस ठाणे आणि आरपीएफ पुणे युनिटच्या संयुक्त कारवाईत दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत, जे रेल्वे प्रवाशांकडून मोबाईल चोरी करत होते. ही कारवाई दि. ०३/०९/२०२५ रोजी करण्यात आली. फिर्यादी रूतुराज दिलीपराव काटकर (वय २६, जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी) यांनी दि. ३०/०८/२०२५ रोजी दानापुर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून १५,०००/- रुपये किमतीचा Vivo मोबाईल चोरी झाला असल्याची तक्रार लोहमार्ग पोलीस...
मालाड वॉर्ड क्र. ५० मध्ये तन्वी दिनेश राव यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन; आदित्य ठाकरे यांची उपस्थिती
मुंबई : आज मालाड येथील वॉर्ड क्रमांक ५० मधील उमेदवार तन्वी दिनेश राव यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण...
नाशिकमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर सामूहिक गायन; राष्ट्रप्रेमाची स्फूर्ती देणारा भव्य उपक्रम
नाशिक | प्रतिनिधी नाशिक शहरात राष्ट्रप्रेमाचा जागर करणारा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रम साकारला गेला. झेप कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आर.पी. विद्यालय, नाशिक येथे तब्बल ३१ हजार शाळकरी विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर सामूहिक गायन मोठ्या उत्साहात पार पडले. या भव्य कार्यक्रमाला राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. हजारो विद्यार्थी एकाच सुरात राष्ट्रभक्तीपर गीतांचे गायन...











