पुणे : पुणे शहरातील कात्रज आणि परिसरातील नागरिकांना १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. पुणे महापालिकेच्या जलविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगम मंदिराजवळील मोठ्या दाबाच्या पाईपलाइनमध्ये गळती आढळल्यामुळे त्या ठिकाणी अत्यावश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याचबरोबर राजमाता सबवेच्या परिसरातही संरचनात्मक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होणार आहे.
महापालिकेच्या जलविभागाने सांगितले की, १८ एप्रिल रोजी पाणीपुरवठा सुरळीत होईल, मात्र तो कमी दाबाने आणि उशिरा होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी पूर्वतयारी करावी. दुरुस्तीच्या काळात पाण्याचा अपव्यय टाळावा आणि साठवलेले पाणी काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पाणीपुरवठा खंडित होणारे परिसर पुढीलप्रमाणे:
-
निलगिरी चौक
-
चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक
-
भारतीय विद्यापीठ
-
भारती विहार
-
चंद्रभागा नगर
-
सावंत विहार
-
सावंत गार्डन
-
वंडर सिटी
-
कदम प्लाझा
-
ज्ञानेश्वरी गार्डन
-
माणिक मोती
-
नारायणीधाम
-
दत्तानगर
-
संतोष नगर
-
अंबेगाव बुद्रुक





