पिंपरी–चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ (क) मध्ये प्रचाराला वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून नागरिकांना परिवर्तनाचा संदेश दिला. “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक शिक्षित महिला, कायद्याची जाण असलेली वकील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उभी राहणारी कार्यकर्ती,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेची ठाम मांडणी केली.
त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विकास हा केवळ घोषणा आणि फलकांपुरता मर्यादित न राहता तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष जाणवला पाहिजे. “आता थांबायची वेळ संपली आहे. आता बदल घडवण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत त्यांनी प्रभागातील मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या घोषणेला दाद दिली.
अॅड. कुलकर्णी यांनी सांगितले की, महिलांची सुरक्षितता, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, तसेच सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणे हेच त्यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असतील. कायद्याचे सखोल ज्ञान आणि सामाजिक कामाचा अनुभव याच्या बळावर महापालिकेत गेल्यावर प्रत्येक प्रश्न सभागृहात ठामपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आपल्या राजकीय प्रवासात नागरिकांचा विश्वास, पाठिंबा आणि एक मताचा हात अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. “तुमचा एक मताचा हात माझ्यासाठी ताकद ठरेल आणि तोच प्रभागाच्या विकासाचा मार्ग ठरवेल,” असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह पुढे करत त्यांनी, 🕰️ “बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” हा परिवर्तनाचा आणि नव्या नेतृत्वाचा नारा दिला. या घोषणेमुळे प्रचारसभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये नव्या उमेदीचा संचार झाल्याचे चित्र दिसत आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ‘घड्याळ’ चिन्हावर मतदान करून विकासाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. “चला, एकत्र येऊया… नवे नेतृत्व घडवूया… आणि आपल्या प्रभागाचा नवा विकासाचा अध्याय सुरू करूया!” या शब्दांनी त्यांनी आपले भाषण संपवले, तेव्हा उपस्थितांमध्ये मोठ्या उत्साहाची लाट उसळली.