Home Breaking News श्रेयाने दादरमध्ये तिचं हे नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ‘द बिग फिश...

श्रेयाने दादरमध्ये तिचं हे नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ‘द बिग फिश अँड कंपनी’ हे तिचं रेस्टॉरंट सीफुड साठी स्पेशल आहे. त्यामुळे खवय्यांची नक्कीच चंगळ असणार आहे.

मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून लोकप्रियता मिळवलेल्या श्रेयाने नुकतंच व्यवसायात पाऊल टाकलं आहे. श्रेयाने नवं रेस्टॉरंट सुरू करत हॉटेल व्यवसायातील तिच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ‘द बिग फिश अँड कंपनी’ असं श्रेयाच्या हॉटेलचं नाव असून नुकतंच या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. श्रेयाच्या या रेस्टॉरंटला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही भेट दिली.श्रेयाच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटन समारंभावेळी चित्रा वाघ यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लोकमत फिल्मीशी संवाद साधला. श्रेया बुगडेचं कौतुक करत चित्रा वाघ म्हणाल्या, “श्रेया घराघरात पोहोचलेली आहे. आता ती लोकांच्या मनामनातही पोहोचेल. कारण, मनात पोहोचण्याचा रस्ता पोटातून जातो. याचं प्लॅनिंग गेलं वर्षभर सुरू आहे. प्रत्येक गोष्ट इथे विचार करुन केली गेली आहे. खुर्ची कशी असावी, ताट कसं असावं…या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. येणारा प्रत्येक माणूस जेवण तृप्त होऊन गेला पाहिजे, या अनुषंगाने ही संपूर्ण टीम काम करत आहे.”