Home Breaking News अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे नागपूरची...

अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे नागपूरची धुरा

पुण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बढती झाली असून त्यांच्या जागी नागपूरचे पोलील आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. इतरही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत.

रितेश कुमार होमगार्डचे महासमादेश

पुण्याचे पोलिस आयु्क्त असलेल्या रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेश म्हणून बढती करण्यात आली आहे. होमगार्डचे अपर पोलिस महासंचालक आणि उप महासमादेशक असलेले प्रभात कुमार यांची नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्यचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहआयुक्त असलेल्या शिरीष जैन यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून बढती झाली आहे. महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दीपक पांडे यांची महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक म्हणून बढती झाली आहे.
प्रवीण पवार पुणे शहर पोलीस सह आयुक्त
कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्त म्हणून निवड झाली आहे. पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक झाले आहेत. निसार तांबोळी यांची राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये सहआयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. एटीएसमध्ये विशेष पोलीस निरीक्षक असणारे ए. डी. कुंभारे यांची मुंबई वाहतूक विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त निवड झाली आहे. चंद्रकिशोर मीना एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून तर आरती सिंह यांची राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून नियुक्ती झाली आहे.

पद आणि कंसात नेमणूकीचे ठिकाण खालील प्रमाणे :
दत्तात्रय कराळे ( नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक ), संजय शिंदे ( पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक ), * प्रवीण कुमार पडवळ (* विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण आणि खास पथके ) बोल संजय दराडे (* कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक ), ज्ञानेश्वर चव्हाण ( ठाणे शहराचे पोलिस सह आयुक्त ), एस.डी. एनपुरे ( नवीमुंबई पोलिस सह आयुक्त ) , एन.डी. रेड्डी ( पोलिस आयुक्त, अमरावती शहर ), संदीप पाटील ( नक्षल विरोधी अभियान, नागपूर, विशेष पोलिस महानिरीक्षक ), विरेंद्र मिश्रा ( विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ), रंजन कुमार शर्मा ( आर्थिक गुन्हे शाखा पुणे, विशेष महानिरीक्षक ), नामदेव चव्हाण ( राज्य राखीव बल नागपूर, विशेष पोलिस महानिरीक्षक ), राजेंद्र माने ( सह संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी ), विनिती साहु ( अपर पोलीस आयु्क्त, संरक्षण आणि सुरक्षा, बृहन्मुंबई ) , एम. राजकुमार ( पोलिस आयुक्त, सोलापूर शहर), अंकित गोयल ( पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र ), बसवराज तेली ( पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस उप महानिरीक्षक), शैलेश बलकवडे ( अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर), शहाजी उमाप ( विशेष शाखा, मुंबई, अपर पोलिस आयुक्त ) एस.जी*दिवाण* ( पोलिस उप महानिरीक्षक, पोलिस आणि माहीती तंत्रज्ञान, पुणे ), संजय शिंत्रे ( पोलिस उप महानिरीक्षक, दक्षता आणि वस्तू सेवा कर विभाग ) आदी अधिकाऱ्यांची बढती आणि बदल्या झाल्या आहेत.

विरेंद्र मिश्रा* ( विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ) रंजन कुमार शर्मा ( आर्थिक गुन्हे शाखा पुणे, विशेष महानिरीक्षक ), नामदेव चव्हाण ( राज्य राखीव बल नागपूर, विशेष पोलिस महानिरीक्षक ) राजेंद्र माने ( सह संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी ) विनिती साहु ( अपर पोलीस आयु्क्त, संरक्षण आणि सुरक्षा, बृहन्मुंबई ) एम. राजकुमार ( पोलिस आयुक्त, सोलापूर शहर), अंकित गोयल ( पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र ), बसवराज तेली ( पुणे, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस उप महानिरीक्षक), शैलेश बलकवडे ( अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर), शहाजी उमाप ( विशेष शाखा, मुंबई, अपर पोलिस आयुक्त ) एस.जी*दिवाण* ( पोलिस उप महानिरीक्षक, पोलिस आणि माहीती तंत्रज्ञान, पुणे ), संजय शिंत्रे ( पोलिस उप महानिरीक्षक, दक्षता आणि वस्तू सेवा कर विभाग ) आदी अधिकाऱ्यांची बढती आणि बदल्या झाल्या आहेत.