Home Breaking News पुणे पोलीस आयुक्तांकडून 107 व्या संघटित टोळ्यांवर कारवाई मुंढवा...

पुणे पोलीस आयुक्तांकडून 107 व्या संघटित टोळ्यांवर कारवाई मुंढवा परिसरात दहशत माजवणाऱ्या मंगेश तांबे टोळीवर ‘मोक्का’!

हॉटेलच्या बीलावरुन शिवीगाळ करत असताना शिवीगाळ करु नका येथे महिला आहेत, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी बिअरच्या बाटलीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करत परिसरात दहशत माजवली. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश तांबे व त्याच्या इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 107 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. ही कारवाई **पोलीस आयुक्त रितेश कुमार,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे (सह पोलीस आयुक्त अतिरिक्त कार्यभार)
रामनाथ पोकळे ,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 चे डी आर राजा
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे
पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिता रोकडे
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर
पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड , पोलीस अंमलदार हेमंत झुरुंगे, दीपक कांबळे, रविंद्र देवढे, विजय माने यांच्या पथकाने केली.*
*