पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत घोरपडी, बी.टी. कवडे रोड, थोपटे चौक येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रेल्वे लाईन वरील लोखंडाचे गर्डर लाँच करण्यासाठी थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद (Road Closed) करण्यात येणार आहे. 6 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या दरम्यान हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. (PMC) पर्यायी मार्ग*
थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांनी, बी.टी. कवडे रोडवरील स्मार्ट पॉईंट/वनराज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (बी.जी. शिर्के कंपनी गेट क्र.1) म्हणजेच वठारे मळा रस्ता या पर्यायी मार्गाचा वापर करवा.
पर्यायी मार्ग हा केवळ दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला यांनी कळवले आहे.