Home Breaking News *पुणे महापालिकेची कर्वेनगर भागात नवीन पाण्याची लाईन विकसित;

*पुणे महापालिकेची कर्वेनगर भागात नवीन पाण्याची लाईन विकसित;

अखेर कर्वेनगर मधील मावळे आळी परिसरातील बऱ्याच महिन्याचा पाण्याचा प्रश्न आज सुटला असून येथील सर्व रहिवाशांना चांगल्या व योग्य दाबाने पाणीपुरवठा आज पासुन चालू झालेला आहे. प्रभागात असणाऱ्या मावळे आळी परिसरात नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते. या अनुषंगाने भागातील नागरिकांनी संपर्क साधला असता प्रत्यक्ष त्या जागी जाऊन श्री. स्वप्नील दुधाने अध्यक्ष, रा. काँ. कोथरूड विधानसभा मतदारसंघ यांनी पाहणी केली. या ठिकाणी विकसित करण्यात आलेली सहा इंची नवी पाईपलाईन जुन्या पाईपलाईनला जोडण्यात आली. याकरिता काल व आज प्रत्यक्ष पुणे महानगरपालिकेच्या अधिकारीसदर ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जूनी चार इंची असल्याने योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्यास अडथळा निर्माण होत होता. पुणे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधून सहा इंची पाईपलाईन विकसित करण्यासंबंधी वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पाठपुरावा करून पुणे महापालिकेमार्फत सहा इंची लाईन नवीन विकसित केली गेली. वर्गास तसेच पुणे महानगरपालिकेच्या पाणी सोडणाऱ्या सर्व टीम यांच्याशी चर्चा केली. आज या पाईपलाईनचे परीक्षण करण्यात आले असून येथील सर्व रहिवाशांना चांगल्या व योग्य दाबाने पाणीपुरवठा आज पासुन चालू झाला आहे.