Home Breaking News ज्या भागात लहानाचा मोठा झाला, आणि ज्या ठिकाणी शरद मोहोळ चा खुनाचा...

ज्या भागात लहानाचा मोठा झाला, आणि ज्या ठिकाणी शरद मोहोळ चा खुनाचा कट रचित दहशत करून वर्चस्व गजविण्याचं ठिकाणीच पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड विठ्ठल शेलार ची धिंड काढली…….

विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील मुठा गावापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या उरवडे या गावचा मुळचा रहिवासी आहे. विठ्ठल शेलार याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे होते. त्याच्यावर मोक्का कारवाई केली होती. त्यातून जामीन मिळाल्यावर २०१७ मध्ये त्याने तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली होती.गॅगस्टर शरद मोहोळ याचा खून प्रकरणात अटक करण्यात आलेला गुंड विठ्ठल शेलार हा ज्या भागात दहशत माजवत होता, त्याच भागात त्याच्या हातात बेड्या घालून पोलिसांनी धिंड काढली.शरद मोहोळ खूनतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याच्या हातात बेड्या घालून दोन बाजूने दोन पोलिसांनी खांद्यामधून दोरीने आवळून त्याला रस्त्याच्या कडेने चालवत नेले जात होते. विठ्ठल शेलार हा गुमान खाली मान घालून पोलिस सांगतील तसा जात होता. वाकड येथील कावेरी नगर परिसरातील पोलिसांनी त्याला फिरविला.शरद मोहोळ खून प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर आता पोलीस त्याची पाळेमुळे खणून काढू लागली आहेत. त्यातून पोलिसांनी विठ्ठल शेलारची बुलेटप्रुफ स्कॉपिओ गाडी जप्त केली आहे. शेलार याने ती पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते शोध घेत होते. त्यावेळी शेलार याच्या साथीदारांनी ती गाडी इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरु केला. ते गाडी घेऊन जात असताना पोलीस आपल्या मागावर असल्याचे त्याच्या साथीदारांना समजल्यावर त्यांनी ही गाडी रस्त्यात सोडून पळ काढला. पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. शरद मोहोळ प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ६ महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत.ज्या भागात लहानाचा मोठा झाला, त्याच राहत्या घराच्या परिसरातून पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. वाकड भागात धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.