Home Breaking News जागतिक क्रमवारीत असलेली आरती पाटील ह्या बॅडमिंटन खेळाडूचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी...

जागतिक क्रमवारीत असलेली आरती पाटील ह्या बॅडमिंटन खेळाडूचा ‘पुनीत बालन ग्रुप’शी करारबद्ध;…….

आरती पाटील ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू असून ती सध्या महिला एकेरी SU5 साठी पॅरा-बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. कोल्हापुर जिल्हयातील उजगावात जन्मलेल्या आरतीने २००८ मध्ये धावपटू म्हणून मैदानावर प्रवेश केला तेंव्हाच २००९ मध्ये तिने रॅकेट उचलण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बॅडमिंटनपटू म्हणून तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पुढच्याच वर्षी तिने राष्ट्रीय स्तरावर खेळायला सुरुवात केली. तथापि; २०१७ पर्यंत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश पाहिले नाही. दुबई, यूएई येथे झालेल्या ‘आशियाई युवा पॅरा गेम्स’मध्ये तिने जोडीदार अरबाज अन्सारीसोबत पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. पुनीत बालन ग्रुप च्या वतीने आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती जानोबा पाटील आता ‘पुनीत बालन ग्रुप’शी करारबद्ध झाल्या आहेत. तिच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ सर्वतोपरी सहाय्य करणार आहे.२०१८ मध्ये तिने डेन्मार्क येथे झालेल्या व्हिक्टर-डेन्मार्क पॅरा-बॅडमिंटनमध्ये कास्यपदक पटकावले आणि त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये ‘युगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल’मध्ये पदक पटकाविले. तिच्या यशामुळे स्वित्झर्लंडमधील २०१९ ‘जागतिक पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियनशिप’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या २१ खेळाडूंमध्ये तिचा समावेश होता. ब्राझील आणि पेरू पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनलमध्ये देखील तिने सहभाग घेतला आहे. तिच्या यापुढील करिअरमध्ये जागतिक पातळीवर स्पर्धेसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून आर्थिक मदतीबरोबर सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असून तसा सहकार्य करार तिने ‘पुनीत बालन ग्रुप’सोबत केला आहे‘‘‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून प्रतिभावंत आणि गरजू खेळाडूंना त्यांचे खेळातील करिअर घडविण्यासाठी मदत करण्याचे प्रयत्न केले जातात. अशा अनेक खेळाडूंना हात देण्याची संधी आम्हाला मिळाली. आरती पाटील हीसुद्धा एक गुणवंत खेळाडू असून तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचवावे, यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून तिला सर्वतोपरी मदत केली जाईल.’’