लोणावळा: आडवोकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे विज्ञान, चित्रकला, इतिहास, गणित आणि कम्प्युटर विषयांवर आधारित भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कलात्मक रांगोळी, आकर्षक मॉडेल्स आणि विविध चित्रांचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्रदर्शनाचे उद्घाटन नारायण भार्गव ग्रुपचे सर्वेसर्वा श्री नारायण भार्गव आणि विद्यानिकेतन ट्रस्टचे अध्यक्ष अड. माधवराव भोंडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. राधिका भोंडे, कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे डॉ. संजय पुजारी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, तसेच पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक आणि शशिकला तिकोणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये:
विद्यार्थ्यांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती, विज्ञानातील प्रयोगांचे मॉडेल, कम्प्युटर आणि गणिताशी संबंधित मॉडेल्स, तसेच इतिहासातील महत्त्वाच्या घटनेची चित्रे सादर केली. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक:
संस्थेच्या सचिव सौ. राधिका भोंडे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विविध कला शिकण्याची आणि त्यांची सादर करण्याची संधी मिळावी यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन महत्त्वाचे आहे. पालकांनीही आपल्या मुलांना अशा उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.”
श्री. नारायण भार्गव आणि अड. माधवराव भोंडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले.
विद्यालयातील शिक्षकांनीही प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम आदर्श ठरला आहे.