Home Breaking News तबला सम्राट उस्ताद जाकिर हुसैन यांचे निधन: भारतीय संगीताच्या आकाशातील तेजस्वी तारा-भारतीय...

तबला सम्राट उस्ताद जाकिर हुसैन यांचे निधन: भारतीय संगीताच्या आकाशातील तेजस्वी तारा-भारतीय संगीत विश्वावर शोककळा

19
0

जगप्रसिद्ध तबला वादक आणि भारतीय संगीताचे महान दैवत उस्ताद जाकिर हुसैन यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सैन फ्रान्सिस्को येथे अखेरचा श्वास घेतला. भारतीय शास्त्रीय संगीत आणि तालविष्काराला जागतिक पातळीवर नेण्याचे काम उस्ताद जाकिर हुसैन यांनी केले. उस्ताद झाकीर हुसेन ( ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत. त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.

सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण

झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.[] हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.

त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.

हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.

कारकीर्द

झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.

वैयक्तिक आयुष्य

हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.

पुरस्कार

  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा ‘अकादमी रत्न’ पुरस्कार (जुलै २०१९)
    स्मृतींमध्ये राहणारा वारसा:
    उस्ताद जाकिर हुसैन यांनी भारतीय संगीताचा प्रसार केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभर केला. त्यांचे संगीत हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा राहील.संगीत क्षेत्रातील मोठी हानी:
    त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या संगीताच्या स्वरांची आठवण संगीतप्रेमींना कायमच प्रेरणा देत राहील.