Home Breaking News मुंबईत भीषण अपघात: कुर्ल्यात बीईएसटी बसचा थरार, तीन मृत्युमुखी; २० हून अधिक...

मुंबईत भीषण अपघात: कुर्ल्यात बीईएसटी बसचा थरार, तीन मृत्युमुखी; २० हून अधिक जखमी.

40
0

मुंबई, ९ डिसेंबर २०२४ – मुंबईच्या कुर्ला भागात सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव बीईएसटी इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांवर आणि रस्त्यावर उभ्या लोकांवर धडक देऊन थरकाप उडवणारी घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बीईएसटी इलेक्ट्रिक बस एका अरुंद रस्त्यावरून जात असताना नियंत्रण गमावून वाहनांना आणि लोकांना धडकताना दिसते.

घटनेचा तपशील:

ही दुर्घटना कुर्ला (पश्चिम) येथील एस. जी. बर्वे मार्गावर, अंजुम-ए-इस्लाम शाळेसमोरील बाजारात घडली. अपघाताच्या वेळी रस्त्याच्या कडेला वाहनं पार्क केलेली होती. एका ऑटो रिक्षाजवळ दोन तरुण आपापसात बोलत उभे होते. अचानक भरधाव वेगात आलेल्या बीईएसटी इलेक्ट्रिक बसने या रिक्षाला आणि एका व्यक्तीला जबर धडक दिली.

त्यानंतर बसने रस्त्याच्या कडेला उभ्या आणखी वाहनांना धडक दिली आणि रस्त्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनाही जखमी केले. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची स्थिती अतिशय चिंताजनक असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

वृत्ताचा परिणाम:

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गोंधळ उडाला. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताने कुर्ला परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.