कात्रज, पुणे – सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे आदर्श शिक्षक किरण पाटील घोरतळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. या शिबिराचा लाभ तब्बल 1856 नागरिकांनी घेतला असून 38 जणांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन देखील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
शिबिराची वैशिष्ट्ये:
या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, डेंटल तपासणी, रक्तदान शिबिर तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती व आयुष्मान भारत कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थी वर्गात मोठा आनंद दिसून आला.
नेत्र तपासणी शिबिर:
मोफत नेत्र तपासणीच्या माध्यमातून 45 नागरिकांना मोतीबिंदू झाल्याचे निदान करण्यात आले. यातील 38 नागरिकांचे मोफत शस्त्रक्रिया तात्काळ करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टीचा लाभ झाला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती:
शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी, सचिव दिलीप शेठ परदेशी, प्रभाकर बाबा कदम, विठ्ठलराव वरुडे पाटील, भगवानराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
माय माऊली वृद्धाश्रमासाठी भोजन:
वाढदिवसाच्या निमित्ताने माय माऊली केअर सेंटरच्या वृद्धांना भोजन दिल्याचा सामाजिक उपक्रमही राबवण्यात आला. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.
लोकांची उत्स्फूर्त उपस्थिती:
शिबिरासाठी कात्रज, कोंढवा, आणि साईनगर येथून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शिबिरात महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
किरण पाटील यांची प्रतिक्रिया:
“वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च टाळून महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब व गरजूंसाठी उपयुक्त कार्य करता आले याचा मला अतिशय आनंद आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया किरण पाटील यांनी दिली.