धुळे: अनेक वेळा कारवाई करूनही पुन्हा एकदा अवैध दारू वाहतूक होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनावर कारवाई करून एकाला ताब्यात घेतले आहे.
धुळे स्थानिक गुन्हे तपास विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त खबऱ्याकडून अवैध दारू वाहतुकीची माहिती मिळाली. या माहितीनुसार, धुळे स्थानिक गुन्हे तपास विभागाच्या (Dhule LCB) पथकाने चाळीसगाव रोड चौफुली परिसरातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका वाहनात पाण्याच्या बाटल्यांच्या आडून मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सदर कारवाईत सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी वाहनासह सुमारे दीडशे बॉक्स भरलेल्या दारूसह जप्त केले आहे. त्याची बाजारातील किंमत ५ लाख २५ हजार रुपये आहे. यासोबतच पोलिसांनी एकूण ७ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.