लोणीकाळभोर (पुणे) – लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढत्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून तब्बल ५,४३,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायांना मोठा आळा बसला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या निर्देशानुसार, अवैध धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकाने सततच्या गस्ती व गुप्त माहितीच्या आधारे परिसरातील अनेक अवैध अड्ड्यांवर लक्ष ठेवले होते.
🔸 कसा केला छापा?
८ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे लोणीकाळभोर येथील गुरुकृपा निवास, माळी मळा, छतावरील पत्राशेडमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांवर जुगार खेळला जात आहे.
पोलिसांनी तात्काळ पथकासह छापा टाकला असता, ११ जण जुगार खेळताना आढळले. त्यांच्या ताब्यातून—
-
₹२५,६६०/- रोख,
-
मोबाईल फोन,
-
जुगार साहित्य,
-
आणि ५ मोटरसायकली,
असा मिळून एकूण ₹५,४३,०१०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
🔸 ११ जणांना अटक; जुगार घरमालक आणि चालवणाऱ्यावरही गुन्हा
जुगार खेळणाऱ्या सर्व ११ जणांसह, जुगार अड्डा चालविणारा आणि जागेचा मालक यांच्यावर लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गु.र.नं. ५५५/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४(५) प्रमाणे कारवाई करण्यात आली.
🔸 अवैध धंद्यांवर पोलिसांचे सलग प्रहार
राजेंद्र पन्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लोणीकाळभोर पोलीस सतत अवैध धंद्यांवर कारवाई करत आहेत. आतापर्यंत—
-
१०३ अवैध दारू धंद्यावर कारवाया
-
१४ गांजा विक्रीवर कारवाया
-
३६ जुगार अड्ड्यांवर छापे
-
१ गुटखा वाहतूक/साठा कारवाई
-
२ इसमांवर MPDA
-
जुगार चालक व दारू विक्रेते यांना तडीपारही







