संघटित गुन्हेगारीविरोधातील मोठा विजय मिळवत, पुणे पोलिसांच्या झोन-4 आणि क्राईम ब्रांचच्या विशेष पथकाने आंतरराज्य बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती व तस्करी रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे.
या धडक मोहिमेत 36 संशयितांना ताब्यात, तर 21 अवैध शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणातील कारवाईमुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
शस्त्र तस्करीचा पहिला धागा – 21 शस्त्रांची जप्ती
पोलिसांनी गेल्या 3 आठवड्यांत शहरातील विविध ठिकाणी धाड टाकून शस्त्रांची मोठी खेप हस्तगत केली—
-
विमानतळ पोलीस स्टेशन – 11 शस्त्रे
-
AEC-1 – 2 शस्त्रे
-
AEC-2 – 3 शस्त्रे
-
युनिट 3 – 1 शस्त्र
-
कालेपाडल पोलीस स्टेशन – 4 शस्त्रे
एकूण 21 अवैध शस्त्रे वेगवेगळ्या कारवायांतून जप्त झाली आहेत.
याप्रकरणी विमानतळ CR क्रमांक 558/2025 नुसार
-
भा.न्या.सं. कलम 111
-
आर्म्स अॅक्ट कलम 3(25)
-
महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142, 37(1), 135
अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
पहाटेची धाड – मध्यप्रदेशातील उमरती गावात शस्त्रनिर्मिती केंद्रावर टप्पा
आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे DCP सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उमरती (मध्य प्रदेश) येथे मोठी आणि धोकादायक पहाटेची कारवाई करण्यात आली.
या कारवाईतील ठळक मुद्दे–
✔️ 36 संशयित शस्त्रनिर्माते ताब्यात
✔️ मोठ्या प्रमाणात शस्त्रांचे पार्ट्स आणि कच्चा माल जप्त
✔️ 50 अवैध भट्टी/भट्टीसदृश फर्नेस नष्ट
✔️ शस्त्रांचे एम्बॉसिंग साहित्य जप्त – ज्यावरून ऑपरेशन अत्यंत संगठित असल्याचे स्पष्ट
✔️ आणखी पुरावे आणि सामग्री तपासात
हे शस्त्र केंद्र “Umarati Shikalgar Arms” (USA) या नावाने कार्यरत असल्याचा मोठा खुलासा झाला आहे.
या रॅकेटचा पुरवठा जाळा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत विस्तारला असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ऑपरेशन ‘USA’ – विशेष दल, प्रचंड फोर्स आणि उच्च-तांत्रिक साधनांचा वापर
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खालील पथकांची संयुक्त कारवाई—
-
DCP झोन 4 – सोमय मुंडे (नेतृत्व)
-
क्राईम ब्रांच युनिट 6 चे PI पठाण आणि अधिकारी
-
20 API/PSI अधिकारी
-
50 पोलिस जवान – झोन 4 आणि क्राईम ब्रांच
-
पोलीस मुख्यालयाचे गॅस गन सेक्शन
-
व्हायरलेस, CCTV, मोबाइल सर्व्हेलन्स टीम
-
QRT हिट टीम्स, बुलेट प्रूफ जॅकेट्स, बॉडी कॅमेरे
मोठा शोध – शस्त्रांचा ‘इंटरस्टेट नेटवर्क’
आतापर्यंतच्या चौकशीतून स्पष्ट झाले की—
-
उमरती गावात मोठ्या प्रमाणावर देसी पिस्तूल, कट्टे आणि बंदुका तयार होत होत्या.
-
त्यांना USA ब्रँड म्हणून बाजारात अवैधरीत्या पुरवठा केला जात होता.
-
यांचे ग्राहक गुन्हेगारी टोळ्या, सशस्त्र गुन्ह्यातील आरोपी, आणि आंतरराज्य तस्कर होते.
आगामी कारवाई
पोलिसांच्या म्हणण्यानुसार—
-
अटक झालेल्यांपैकी नेमके किती जणांना औपचारिक अटक दाखल होणार हे तपासावर अवलंबून
-
गुन्ह्यातील भूमिका, पुरावे, आर्थिक नोंदी, पुरवठा साखळी यांचा सखोल तपास
-
हा सर्वात मोठा इंटरस्टेट शस्त्र तस्करी गट असल्याची शक्यता








