प्रशासनाचा भर दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांवर
बारामती शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेतला गेला. या अंतर्गत तीन हत्ती चौक सुशोभीकरण, धारे साठवण तलावाच्या शेजारील सौंदर्यीकरण, कुस्ती महासंघाजवळील विकासकामे आणि कुस्ती महासंघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनॉल लगत होणाऱ्या लिनिअर गार्डनची पाहणी करण्यात आली.
सुशोभीकरणाचे प्रकल्प – बारामतीत नवा आकर्षणबिंदू!
बारामतीतील तीन हत्ती चौकाचे सुशोभीकरण हे शहराच्या सौंदर्यात महत्त्वाची भर टाकणारे ठरणार आहे. येथील वाहतूक व्यवस्थाही अधिक शिस्तबद्ध होईल. याशिवाय, धारे साठवण तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करून हा परिसर बारामतीकरांसाठी उत्तम पर्यटनस्थळ होणार आहे. पर्यावरणपूरक आणि नागरी सुविधांनी परिपूर्ण हा प्रकल्प शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.
लिनिअर गार्डन – हरित बारामतीसाठी महत्त्वाचा प्रकल्प
कुस्ती महासंघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनॉल लगत लिनिअर गार्डन उभारण्यात येणार असून, या गार्डनसाठी सादरीकरण करण्यात आले. हे गार्डन नागरिकांसाठी व्यायाम, चालण्यासाठी सुंदर मार्ग, ग्रीन जोन आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना – दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश!
विकासकामांचा आढावा घेताना प्रशासनाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामं वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकल्पात हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी प्रशासन नियमित पाहणी करणार आहे.
सेंट्रल पार्क आणि प्रशासकीय भवनाच्या अंतिम टप्प्याचा आढावा
बारामतीतील सेंट्रल पार्क शेजारील सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच प्रशासकीय भवनाच्या बाहेरील रंगकामही अंतिम टप्प्यात पोहोचले असून, याचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
बारामतीच्या विकासाला नवा आयाम!
या सर्व प्रकल्पांमुळे बारामती शहराचे नागरी सौंदर्य वाढणार असून, नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळणार आहेत. बारामती हे नवीन युगातील आधुनिक आणि हरित शहर म्हणून पुढे जाणार आहे.