महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 166

आंतरराष्ट्रीय सायकलिंग पुणे ग्रँड टूर 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान, पुणे बनले जागतिक क्रीडानगरीचे केंद्र

0

पुणे : ‘आंतरराष्ट्रीय सायकलिंग पुणे ग्रँड टूर 2026’ अंतर्गत विविध देशांतून आलेल्या खेळाडूंचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करकमलांनी उत्साहात पार पडला. या भव्य कार्यक्रमामुळे पुणे शहर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर ठळकपणे झळकले आहे. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या...

समर्थ पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी; सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे चोरट्यांचा पर्दाफाश

0

पुणे :- नाना पेठेतील संत कबीर चौक येथील ‘शार्प कलर’ दुकानात चोरी करून मौजमजेसाठी पैसे लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवघ्या चार तासांत जेरबंद केल्याने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिनांक ५ जुलै ते ६ जुलै दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून, कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील रु.१५,५००/- चोरून नेले होते. या प्रकरणी समर्थ पोलीस...

पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा अभिनव उपक्रम! ‘लाईव्ह ट्रॅकिंग वेबसाइट’ सुरु; वाहतुकीसह रस्ता बंदीबाबत रिअल टाइम अपडेट्स

0

पुणे – वारीची परंपरा, श्रद्धा आणि भक्तीच्या महामार्गावर निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी एक विशेष वेबसाईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटद्वारे नागरिकांना रिअल टाइममध्ये पालखीचा सध्याचा मार्ग, वाहतूक परिस्थिती, रस्ते बंदी आणि डायव्हर्जन्सची माहिती सहज मिळणार आहे. पालखी सोहळा आणि वाहतूक नियंत्रण – एकत्रित प्रयत्न पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वारी दरम्यान वारकऱ्यांच्या...

महिलेचा वेष धारण करून कंपनीत चोरी करणारे दोन शिताफीबाज गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात

0

पुणे पोलिसांनी अत्यंत चलाखीने चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल व्हावी या हेतूने महिलेचा वेष, गाऊन, सलवार-कमीज तसेच मास्क व ओढणी घालून कंपनीत चोरी केली होती. मात्र वानवडी पोलिसांच्या तपासपथकाने केवळ सीसीटीव्ही फुटेज, चपलेचा मागोवा आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना गाठले आणि मोठी कामगिरी बजावली. घटनेचा तपशील दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1:43...

चिनी सायबर गुन्हेगारासोबत संगनमत, ८६ लाखांची फसवणूक! पुण्यातील तथाकथित चित्रपट निर्माता अटकेत

0

पुणे – शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीचा मोठा भांडाफोड पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणात चक्क पुण्यातील एरंडवणे भागातील स्वतःला चित्रपट निर्माता म्हणवणाऱ्या शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (वय ३३) याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संवत्सरकार याने चिनी सायबर गुन्हेगार 'बाम्बिनी' सोबत संगनमत करत 'सायबर फसवणुकीसाठी बँक खाते' उपलब्ध...

खडक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : खुनाचा आरोपी अवघ्या २ तासांत जेरबंद

0

पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अतिशय धाडसी आणि शिताफीने कामगिरी करत अवघ्या २ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून कायद्याच्या तावडीत आणले आहे. ही कारवाई केवळ पोलिसांच्या सजगतेचेच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच्या त्यांच्या बांधिलकीचेही उत्तम उदाहरण ठरली आहे. दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी लोहीयानगर येथील इनामके मळा भागात सागर राजु अवघडे (वय ३३) याचा त्याच्या मामाच्या मुलानेच – सुरज नंदु...

महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई :- महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणुकदारांसाठी सर्वात आकर्षक 'डेस्टिनेशन' बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे. भारतीय विदेश सेवेतील सेवा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून राज्य शासन विविध क्षेत्रातील बाबींसाठी नवी धोरणे आखेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, गुंतवणूक संधी आणि राज्याच्या जागतिक स्तरावरील प्रगतीविषयी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र...

माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी; प्रशासनाने परवानगी नाकारल्याने गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, गावात संचारबंदी लागू.

0

सोलापूर, मरकडवाडी: माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रणालीवर अविश्वास व्यक्त करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीस नकार दिल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील परिस्थिती बिघडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गावात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आणि कायदा...

पुण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; समर्थ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, तीन सराईत गुन्हेगार जेरबंद

0

पुणे – शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने तीन सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. या आरोपींनी चार लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या दक्षतेचा आणि कार्यक्षमतेचा उत्तम नमुना ठरली आहे. घटना २५ जून २०२५ रोजी घडली होती. फिर्यादी यांच्या बंद...

पुरस्थितीवर महापालिकेची सतत नजर : नागरिकांसाठी तातडीच्या मदतसेवा सज्ज

0

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे १०० टक्के भरल्याने आणि सततच्या पावसामुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ मदतसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला असून, नागरिकांना आवाहन केले आहे की आपत्कालीन परिस्थितीत त्वरित 020-67331111 / 020-28331111 या...

Copyright ©