Home Breaking News सिंहगड रोडवरील ‘वि मार्ट’ परिसरात दहशतीचा अतिरेक; मोटारसायकलवर आलेल्या सहा दरोडेखोरांकडून धारदार...

सिंहगड रोडवरील ‘वि मार्ट’ परिसरात दहशतीचा अतिरेक; मोटारसायकलवर आलेल्या सहा दरोडेखोरांकडून धारदार शस्त्रांनी हल्ला, अनेक गाड्यांचे नुकसान!

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास मोहीते पॅराडाईज, मॅकडोनाल्ड जवळील ‘अनलिमीटेड (वि मार्ट)’ शोरूम परिसरात मोठा गोंधळ आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सहा अज्ञात इसम धारदार हत्यारांसह मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी शोरूमच्या काचेच्या दरवाज्यावर हल्ला केला, तसेच परिसरातील १५ ते २० चारचाकी वाहनांची तोडफोड केली.

या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फिर्यादी सिक्युरिटी गार्डने धाडसाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या गंभीर घटनेची नोंद सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३२२/२०२५ अन्वये करण्यात आली आहे.

 गुन्ह्याची नोंद खालील कलमांनुसार:

भारतीय दंड विधान: 189(2), 190, 191(2)(3), 131, 351(2)(3), 324(2)

महाराष्ट्र पोलीस कायदा: 37(1), 135

आर्म्स अॅक्ट: 4, 25

क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट: कलम 3(7)

 तपास व पोलीस हालचाल:

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. आर. आर. आडगळे (मो. 9594901418) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती, गोपनीय बातम्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 नागरिकांमध्ये भीती, पोलिसांकडून आवाहन:

सदर प्रकार अत्यंत गंभीर असून, शहरातील शांतता भंग करणाऱ्या टोळ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस विभागाने परिसरातील नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन करत, कोणतीही महत्त्वाची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 पुढील कायदेशीर पावले:

आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

शहरात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सिंहगड रोड भागात गस्त व बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.