Home Breaking News बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: शूटर शिवाच्या चौकशीत मोठे धक्कादायक खुलासे; पुण्यातील बड्या...

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: शूटर शिवाच्या चौकशीत मोठे धक्कादायक खुलासे; पुण्यातील बड्या नेत्यावर शुभम लोणकरची नजर!

92
0

मुंबई: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी शूटर शिवकुमारने पोलिस चौकशीत अनेक खळबळजनक माहिती दिली आहे. त्यानुसार, हत्या घडवून आणल्यानंतर शिवकुमार घटनास्थळीच थांबून होता आणि त्यानंतर लिलावती रुग्णालयात जाऊन ३० मिनिटे थांबून सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री केली. आता, चौकशीत आणखी मोठा खुलासा झाला आहे—बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरने पुण्यातील एका बड्या नेत्याला लक्ष्य केले होते.

शुभम लोणकर हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले आहे. शिवकुमारने सांगितले की, हत्येसाठी विविध शूटरला त्यांच्या हँडलरकडून शस्त्रे पुरवली गेली होती आणि शूटर एकमेकांना ओळखतही नव्हते. हत्येनंतर सर्व शूटर नेपाळला पळून जाणार होते आणि १२ ऑक्टोबर रोजी जम्मू कश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिराजवळ भेटण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. शिवाय, शिवकुमारने खुलासा केला की शुभम लोणकर हा शूटरच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था बघायचा आणि लॉरेन्स बिश्नोई व त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असे.

या घटनेमुळे पोलिस तपासाचा वेग वाढला आहे, आणि भविष्यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश STF ने मिळून शिवकुमारला अटक केली, आणि त्याच्या चौकशीतून महत्त्वाच्या गुन्हेगारी कनेक्शनचा पर्दाफाश झाला आहे.