Home Breaking News समर्थ पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी; सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे चोरट्यांचा पर्दाफाश

समर्थ पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी; सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे चोरट्यांचा पर्दाफाश

109
0
पुणे :- नाना पेठेतील संत कबीर चौक येथील ‘शार्प कलर’ दुकानात चोरी करून मौजमजेसाठी पैसे लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवघ्या चार तासांत जेरबंद केल्याने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दिनांक ५ जुलै ते ६ जुलै दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून, कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील रु.१५,५००/- चोरून नेले होते. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५०/२०२५ भा.दं.वि. कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पथकाने घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. याशिवाय गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिताफीने अटक करण्यात आली.
अटक केलेले आरोपी:
  1. सुजल राजन परदेशी (वय २०) – रा. मंगळवार पेठ
  2. सुभाष राजेश सरोज (वय २१) – रा. मंगळवार पेठ
  3. नितीन विलीप सरोज (वय २२) – रा. मंगळवार पेठ
  4. रोहित मुन्नालाल सरोज (वय २२) – रा. मंगळवार पेठ
या चौघांनी मौजमजेसाठी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, चोरीची रक्कम पोलीसांनी जप्त केली आहे.
या यशस्वी कारवाईसाठी खालील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले:
🔹 अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे
🔹 पोलीस उप आयुक्त श्री. कृषिकेश रावले
🔹 सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने
🔹 वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते
🔹 पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे
तपासात सहभागी अधिकारी आणि कर्मचारी:
पो.उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पो.कॉ. पागार, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, आंचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव
ही कामगिरी पुणे पोलिसांच्या तत्परतेचे आणि निष्कलंक तपास कौशल्याचे प्रतीक आहे. नागरिकांनी अशा गुन्ह्यांची त्वरित माहिती पोलीसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.