सांगली जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित, सात महिन्यांची गर्भवती असलेल्या हिंदू भगिनीच्या दुःखद मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्व. सौ. ऋतुजा राजगे या तरुण विवाहितेने सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्मांतरणासाठी होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. मात्र मृत्यूपूर्वी तिने आपल्या कृतीतून एकच संदेश दिला – “प्राण सोडला पण हिंदू धर्म नाही सोडला!”
ही घटना केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या अस्मितेचा प्रश्न बनली आहे. तिच्या बलिदानाने हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे आणि धर्मांतराच्या वाढत्या षड्यंत्रांविरोधात एकत्र येण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
धर्मांतर थांबवा, हिंदूंचा आवाज बुलंद करा!
स्व. ऋतुजाच्या आत्महत्येने एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा केला आहे – धर्मांतरासाठी होणारा छळ आणि त्याविरोधात कोणतीच प्रभावी कायदेशीर कारवाई का नाही? याच पार्श्वभूमीवर, आगामी पावसाळी अधिवेशनात धर्मांतरबंदी कायदा पारित करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव टाकण्यात येणार आहे.
सामाजिक संघटनांनी, महिला संघटनांनी आणि हिंदू विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन धर्मांतरविरोधी कायद्याची जोरदार मागणी सुरू केली आहे. हा कायदा केवळ श्रद्धेचा नव्हे, तर स्त्रीसुरक्षेचा आणि धर्मस्वातंत्र्याचा संरक्षण करणारा ठरेल, असे वक्तव्य अनेक संघटनांनी केले आहे.
स्व. ऋतुजाचे बलिदान – अखेरचा ईशारा…!
स्व. ऋतुजा राजगे यांचा मृत्यू हा एक “सांस्कृतिक हत्या” आहे, असा आरोप करत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “हा क्षण जागा होण्याचा आहे. हिंदू समाजाने आता फक्त सहन न करता, ठोस कृती करण्याची वेळ आली आहे,” अशा भावना ठिकठिकाणी व्यक्त होत आहेत.
सामाजिक एकजूट आणि कायद्यासाठी एल्गार:
– धर्मांतराच्या बळजबरीविरुद्ध कठोर कायदा व्हावा. – महिलांच्या आत्मसन्मानासाठी राज्य शासनाने त्वरित कारवाई करावी. – धर्मांतर करायला भाग पाडणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद असावी. – स्व. ऋतुजासारख्या पीडितांना न्याय मिळवून द्यावा.
या घटनेमुळे “धर्मांतर विरोधी जनजागृती अभियान” राज्यभरात सुरू होण्याची शक्यता आहे. विविध जिल्ह्यांमध्ये कँडल मार्च, मेळावे, धर्मरक्षा समित्यांची स्थापना आणि धर्मांतरविरोधी सह्याचळवळीचे आयोजन केले जाणार आहे.