Breaking News

Home Breaking News Page 49

अपघाताबाबत नवे वास्तव समोर : ट्रक ओव्हरलोड असला तरी दुर्घटनेचे मूळ कारण बोलेरो चालकाची निष्काळजीपणा

0

अपघाताच्या प्रकरणात आता महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. संबंधित ट्रक ओव्हरलोड आणि अवैध असल्याचे स्पष्ट असले, तरी या अपघाताचा थेट संबंध ओव्हरलोडिंगशी नसल्याचे प्रत्यक्षदर्शी व प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. उलटपक्षी, SDO यांच्या बोलेरो वाहनचालकाची गंभीर निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो चालकाने वाहन वळवताना इंडिकेटरचा वापर केला नाही, तसेच अत्यंत हळू...

भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी ६ अत्याधुनिक LED व्हॅन सज्ज; पुणे शहर कार्यालयात भव्य लोकार्पण सोहळा

0

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचार यंत्रणेला नवे बळ देत ६ अत्याधुनिक LED व्हॅन नागरिकांच्या सेवेत उतरविल्या आहेत. पुणे शहर कार्यालयात या LED व्हॅनचे भव्य लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या...

आंबेगाव खून प्रकरणाचा छडा; नांदेडमधून आरोपी जेरबंद, पुणे पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई

0

पुणे शहरात घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून, आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत आरोपींना नांदेड येथून अटक करत मोठे यश मिळवले आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या रागातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौक परिसरातील गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे ही गंभीर घटना घडली....

वाघोलीत अवैध दारूविक्रीवर पुणे पोलिसांचा जोरदार घाव; २१ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

0

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात मोठी कारवाई करत दारू माफियांना चांगलाच धक्का दिला आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २१,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मा. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपास पथक आव्हळवाडी व मांजरी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस...

मनसेकडून मोठी घोषणा : मुंबई उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली

0

मुंबई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय घेतला असून, मुंबई उपशहर अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांची उमेदवारी आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी अधिकृतपणे जाहीर केली. या घोषणेमुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण मुंबई उपशहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर करताना राजसाहेब ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांच्या संघटनात्मक कामाचा, जनतेशी...

मुंबई महापालिका निवडणूक : मुलुंड पश्चिम प्रभाग १०७ मधून डॉ. नील सोमय्या यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज भाजपचे युवा नेते डॉ. नील सोमय्या यांनी मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ मधून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला. या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, आमदार मिहीर कोटेचा तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. नील सोमय्या यांनी माध्यमांशी...

पुण्यात मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; ४ दिवसांत २४२ जणांवर कारवाई

0

पुणे | दि. 29 डिसेंबर 2025 पुणे शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सलग चार दिवस विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख चौक, रस्ते व...

वानवडी पोलिसांचा धडाका! टेम्पोचा पाठलाग करून १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह ४ आरोपी अटकेत

0

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात अवैध दारूविक्री व वाहतुकीविरोधात वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी आणि धाडसी कारवाई करत टेम्पोचा थरारक पाठलाग करून तब्बल १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह चार आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर दारूव्यवसायाला मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या सतर्कतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. ही कारवाई दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी वानवडी पोलीस...

पर्वती पोलिसांची मोठी कामगिरी; पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालत पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपीस अटक करून तब्बल १४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांना कडक इशारा मिळाला आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा...

मांजरी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत, ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे | प्रतिनिधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करून मोठी कामगिरी बजावण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने नाकाबंदी, पेट्रोलिंग, गुन्हेगार तपासणी तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार,...

Copyright ©