Breaking News

Home Breaking News Page 28

बनावट सोन्याच्या बिस्किटांचा आमिष दाखवून फसवणूक करणारा अट्टल आरोपी पुणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0

पुणे शहरात बनावट सोन्याच्या बिस्किटांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक २ ने अटक केली आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात बनावट सोन्याची बिस्कीटे, बेनटेक्स चेन तसेच लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत...

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या माध्यमातून सायकलिंगला नवसंजीवनी देण्यासोबतच पुणे शहराची ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या स्पर्धेचे आयोजन 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत करण्यात येणार असून, ती यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यातील विद्यार्थी स्वयंसेवक व प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन...

शिक्षण आणि समाजसेवेच्या दिशेने विधायक पाऊल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ब्राईट बस प्रकल्पा’चे लोकार्पण

0

मुंबई, ११ जुलै २०२५ | विधान भवन :- राज्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राला बळकटी देणाऱ्या ‘ब्राईट बस प्रकल्प’ या अभिनव उपक्रमाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दिमाखात पार पडले. या कार्यक्रमात आ. प्रसाद लाड, आ. प्रवीण दरेकर, आ. चित्रा वाघ, आ. डॉ. परिणय फुके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. स. ११.२५ वा. मुंबईतील विधान भवनात पार पडलेल्या या...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात टळला; झाड कोसळले तरी उद्योजक बचावले!

0

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्वागत हॉटेलसमोर एक धक्कादायक प्रकार घडला. आज मंगळवारी (ता. २२ जुलै) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास, रस्त्यालगत लावलेल्या एका चारचाकी वाहनावर अचानक झाड कोसळले. ही चारचाकी आळंदी म्हातोबा येथील युवा उद्योजक केतन मच्छिंद्र जवळकर यांची असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन पार्क करत असतानाच अचानक गुलमोहराचे एक प्रचंड झाड त्यांच्या गाडीवर कोसळले....

मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना! ४ पर्यटकांचा मृत्यू, ५१ जण जखमी – आमदार सुनील शेलके घटनास्थळी धावले

0

मावळ तालुक्यातील कुंडमळा (इंदुरी) येथील ३० वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी अचानक कोसळल्याने मावळ हादरले. इंद्रायणी नदीवर उभा असलेला हा पूल कोसळल्याने पुलावर उपस्थित असलेल्या १०० ते १२५ पर्यटकांमध्ये अफरातफरी माजली. या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून ५१ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुना पूल, प्रशासनाकडून दुर्लक्ष? हा पूल मुख्यतः दोन गावांना जोडणारा होता, मात्र गेल्या काही वर्षांत...

स्वारगेट व पुणे स्टेशन परिसरातील प्रवाशांचे मोबाईल चोरणारे दोन चोरटे जेरबंद; १२ मोबाईलसह १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे (स्वारगेट) – प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्वारगेट पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे एकूण १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, जप्त मोबाईल्सची एकूण किंमत अंदाजे १,८०,०००/- रुपये आहे. स्वारगेट एस.टी. स्टँड, पीएमपीएमएल बस थांबा, पुणे रेल्वे स्थानक आणि शिवाजीनगर परिसरात गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोबाईल चोरी जाण्याच्या घटना...

चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश

0

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेतील १९९८-९९ बॅचचा स्नेहमेळावा आठवणींनी भरलेल्या वातावरणात उत्साहात संपन्न!

0

बोपोडी, पुणे | प्रतिनिधी :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला, बोपोडी येथील सन १९९८-९९ बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २६ वर्षांनंतर एका स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींनी भारलेले वातावरण पुन्हा एकदा अनुभवले गेले. ११ जून २०२५ रोजी पार पडलेल्या या खास कार्यक्रमात माजी विद्यार्थी, शिक्षक, गुरुजन आणि कर्मचारी यांचा सहभाग भावनांनी ओथंबलेला होता. स्वागतपर भाषणानंतर विद्यार्थ्यांनी एकेक करून आपल्या...

फक्त एका अँब्युलन्सच्या नावावरून इतिहास घडला! पुण्यात राघवेंद्र उर्फ बापू मानकरांचा विक्रमी विजय, महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला

0

पुणे: पुणे महानगरपालिकेसह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, या निकालांमधून एक ऐतिहासिक आणि चर्चेचा विषय ठरलेला विजय समोर आला असून, पुणे महापालिकेतील राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला...

महाराष्ट्रात गिलियन-बारे सिंड्रोमचा धोका वाढला! पुण्यात आणखी ५ रुग्ण आढळले, मृतांचा आकडा ५ वर

0

पुणे: महाराष्ट्रात गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पुण्यात सोमवारी आणखी पाच रुग्ण आढळले असून, राज्यातील संशयित रुग्णसंख्या १६३ वर पोहोचली आहे. यातील १२७ रुग्णांची पुष्टि झाली आहे, तर आतापर्यंत या आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या राज्यातील १६३ संशयित GBS रुग्णांमध्ये ३२ रुग्ण पुणे शहरातून ८६ रुग्ण नव्याने समाविष्ट झालेल्या PMC...

Copyright ©