पुणे: महाराष्ट्रात गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पुण्यात सोमवारी आणखी पाच रुग्ण आढळले असून, राज्यातील संशयित रुग्णसंख्या १६३ वर पोहोचली आहे. यातील १२७ रुग्णांची पुष्टि झाली आहे, तर आतापर्यंत या आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या
राज्यातील १६३ संशयित GBS रुग्णांमध्ये
-
३२ रुग्ण पुणे शहरातून
-
८६ रुग्ण नव्याने समाविष्ट झालेल्या PMC हद्दीतील गावे
-
१८ रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरातील
-
१९ रुग्ण पुणे ग्रामीणमधून
-
८ रुग्ण इतर जिल्ह्यांतून
यातील ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, ४७ जण ICU मध्ये आहेत, तर २१ रुग्णांना व्हेंटिलेटर सपोर्टची गरज आहे.
GBS म्हणजे काय?
गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे स्वतःच्या नर्व्ह प्रणालीवर हल्ला होतो. यामुळे
-
स्नायू कमकुवत होतात
-
हात-पाय सुन्न होतात
-
श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो
-
काही रुग्णांना गिळताना अडचण होते





