Home Breaking News चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या...

चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश

49
0
पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा लागत होता.
पावसाळा संपूनही रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र त्या दुर्लक्ष करण्यात आल्या. अखेर यश साने यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि आंदोलनामुळे पालिका प्रशासनाला जाग आली आणि आज प्रत्यक्ष रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले.
या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे नागरिकांना फक्त सुरक्षित आणि सुलभ प्रवास मिळणार नाही, तर परिसराच्या सर्वांगीण विकासातही मोठा हातभार लागणार आहे. यश साने यांनी या कार्यक्रमात नागरिकांचे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार मानले आणि भविष्यकाळातही विकासकामांसाठी नागरिकांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
मोरेवस्तीतील नागरिकांनी यश साने यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. या डांबरीकरणामुळे परिसरातील वाहतुकीची गती वाढेल, खड्ड्यांमुळे निर्माण होणारे अपघात कमी होतील, तसेच स्थानिक व्यवसायिक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांनीही यश साने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर समाधान व्यक्त केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिक-प्रशासन सहकार्याने विकास कामे सुरळीत चालत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.