गडचिरोली | १० जून २०२५ माओवाद्यांच्या अड्ड्यावर थेट धडक देऊन अनेक निरपराधांचे प्राण वाचवणारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून गडचिरोली जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात प्रेरणास्त्रोत ठरलेले मा. API सदाशिव देशमुख सर यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
शौर्याचा इतिहास: देशमुख सरांनी आजवर १५ माओवाद्यांचा एन्काउंटर, ११ जणांना आत्मसमर्पण, तर ५ माओवादी दहशतवाद्यांना शस्त्रासह अटक करून हजारो निरपराध नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या यशस्वी कार्यवाहीमुळे गडचिरोलीमध्ये माओवाद्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्राप्त पुरस्कार व सन्मान: त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी देशमुख सरांना अनेक मान्यवर सन्मान प्राप्त झाले आहेत ▪️ पोलीस महासंचालक पदक ▪️ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक ▪️ विशेष सेवा पदक ▪️ खडतर सेवा पदक ▪️ आणि इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
रात्रीच्या अंधारात सर्जिकल ऑपरेशनपासून ते गावागावांत शांती बैठका घेऊन जनजागृती करणारे देशमुख सर केवळ एक पोलीस अधिकारी नसून एक प्रेरणादायी नेता आहेत. स्थानिक गणेश मंडळांना, सामाजिक संस्थांना आणि युवकांना मार्गदर्शन करणारे हे व्यक्तिमत्व, पोलीस आणि जनतेमध्ये सेतू बांधणारे आहेत.
गौरवाचा क्षण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला हा सन्मान केवळ देशमुख सरांचा नव्हे, तर गडचिरोलीतील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचा आणि शांततेसाठी झटणाऱ्या नागरिकांचा गौरव आहे.
समाजातून अभिमानाची प्रतिक्रिया: “देशमुख सर हे खरे रियल हिरो आहेत. त्यांनी फक्त गोळीबार केला नाही, तर माणसांची मनंही जिंकली आहेत,” असे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीचा चेहराच बदलला आहे.