Home Breaking News नागपूरच्या गणेशपेठेतील ‘हॉटेल द्वारकामाई’ला बॉम्ब धमकी; सर्वजण सुरक्षित, पोलीस तपास सुरू.

नागपूरच्या गणेशपेठेतील ‘हॉटेल द्वारकामाई’ला बॉम्ब धमकी; सर्वजण सुरक्षित, पोलीस तपास सुरू.

Nagpur's Hotel Dwarkamai Receives Bomb Threat.

नागपूर: शहरातील गणेशपेठ कॉलनी येथील द्वारकामाई हॉटेलला सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

नागपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हॉटेलमधील सर्व व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवले. नागपूरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) राहुल मकनिकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “द्वारकामाई हॉटेलला बॉम्बची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व लोकांना बाहेर काढले आहे. बॉम्ब शोधक पथकाद्वारे सखोल तपासणी करण्यात आली आहे.”

घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण हॉटेलची कसून तपासणी केली आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही, मात्र अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी या धमकीचा स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा असे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपशीलवार तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती जाहीर केली जाईल.