Home Breaking News पुण्यात १५ ऑगस्टला शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

पुण्यात १५ ऑगस्टला शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

42
0
Devraj Padam Agri (वय-१९)

पुणे: पुण्यातील भवानी पेठ परिसरातील एका नामांकित शाळेत १५ ऑगस्ट रोजी सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपी देवराज पदम आग्री (वय १९) याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी जात असताना, आरोपी शाळेच्या मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. मुलगी जवळ येताच, आरोपीने तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढून नेले आणि तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र, पीडित मुलीने धाडस दाखवत आपली सुटका करून घेतली आणि घरी गेल्यावर संपूर्ण प्रकार आईला सांगितला.

त्यानंतर, पीडितेच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

मुलीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला अटक, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.