डोंबिवलीत धक्कादायक घटना: विनोद करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू
डोंबिवलीतील विकास नाका परिसरात असलेल्या ग्लोब स्टेट इमारतीत धक्कादायक घटना घडली आहे. तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नागीना देवी मंजिराम असे मृत महिलेचे नाव आहे, त्या या इमारतीत सफाईकामगार म्हणून काम करत होत्या. त्या पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होत्या.
मंजिराम यांचा मुलगा आणि मुलगी आहेत. आज दुपारी, नागीना देवी आपल्या सहकाऱ्यांसोबत तिसऱ्या मजल्याच्या जिन्याजवळ बसल्या होत्या. विनोदाच्या ओघात त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना हलकेच स्पर्श केला, ज्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या.
या घटनेची नोंद मानपाडा पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.