जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला. संत तुकाराम महाराजांची पालखी अडीच वाजता निघाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक श्रीक्षेत्र देहु नगरमध्ये आषाढी वारीसाठी एकत्र जमले आहेत. सकाळी लवकर श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
विठुरायाचा गजर हजारो वारकऱ्यांच्या तोंडातून सुरु झाला. हातात टाळ आणि डोक्यावर तुळस घेऊन वारकरी वारी सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यात, वारकऱ्यांनी एकाच तालावर टाळ्या वाजवून घोषणा केल्या. संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला होता. तुकोबारायांची पालखी निघाल्याने वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.