Home Breaking News पोलिस गुन्हे पथक: कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळ मटका अड्ड्यावर धाड! सात जणांविरुद्ध...

पोलिस गुन्हे पथक: कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळ मटका अड्ड्यावर धाड! सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हजारोंचा माल जप्त!

मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी शुक्रवारी (दिनांक ०७/०६/२०२४) आपल्या टीमला घटनास्थळी पाठवले. टीमने कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळ धाड टाकली. या धाडीत खालील व्यक्तींना अटक करण्यात आले:
  1. कालुराम पांडुरंग लालगुडे, वय ३१ वर्षे,
  2. कृष्णा धरबा जाधव, वय २४ वर्षे,
  3. किसन जवेरी कोळी, वय ६५ वर्षे,
  4. विलास सोपान बोरडे, वय ५८ वर्षे,
  5. किरण विजय यादव, वय ३२ वर्षे,

त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत, सदर मटका अड्डा मदन वाजे, तळेगाव दाभाडे याच्या नावावर चालवला जात असल्याचे आढळले. एकूण ९२,८९०/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. वडगाव मावळ पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वरील सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि वडगाव मावळ पोलिस पुढील तपास करत आहेत.