Home Breaking News पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसाची गांजा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई..

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसाची गांजा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई..

पिंपरी चिंचवड,दि.१८:- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पथकाने तब्बल 96 किलो गांजासह एक कोटी 31 लाख 55 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.
अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे आणि रणधीर माने यांना १२ जानेवारी रोजी गांजा विक्री प्रकरणी माहिती मिळाली. त्यानुसार म्हस्के वस्ती रावेत येथे बीआरटी रोडवरून कृष्णा मारुती शिंदे (वय २७, रा. शिंदेवस्ती, ता. कर्जत, अहमदनगर), अक्षय बारकू मोरे (वय 29, रा. पाटेगाव, ता. कर्जत, अहमदनगर), हनुमंत भाऊसाहेब कदम (वय 35, रा. कुसडगाव, ता. जामखेड, अहमदनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या तिघांकडून 25 लाख 69 हजार 100 रुपये किमतीचा 25 किलो 691 ग्रॅम गांजा, एक कार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 30 लाख 55 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींनी हा गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे (वय 32, रा. उंडेगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याकडून आणला असून तो गांजा सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी देवी प्रसाद याला उंडेगाव येथून ताब्यात घेतले.
या तिघांकडून 25 लाख 69 हजार 100 रुपये किमतीचा 25 किलो 691 ग्रॅम गांजा, एक कार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 30 लाख 55 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींनी हा गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे (वय 32, रा. उंडेगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) याच्याकडून आणला असून तो गांजा सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली) याला विकणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी देवी प्रसाद याला उंडेगाव येथून ताब्यात घेतले.

रुग्णवाहिकेतून करायचा गांजाची वाहतूक

आरोपी रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे. तो ज्या रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक करायचा त्या दोन रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच देवी प्रसाद याच्याकडून 50 लाख 20 हजार रुपये किमतीचा 50 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

उत्तर प्रदेशातून आणला गांजा

अमली पदार्थ विरोधी पथकाने दुसरी कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली. पोलीस अंमलदार विजय दौंडकर आणि प्रसाद कलाटे यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सन्नीदेवल सिद्धनाथ शर्मा (वय 21), सन्नीदेवल भगवानदास भारती (वय 23, दोघे रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना कुरुळी येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 20 लाख 79 हजार 600 रुपये किमतीचा 20 किलो 196 ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. आरोपींनी हा गांजा उत्तर प्रदेश येथून राजेश कुमार (रा. घोरावल, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले आहे.

1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल

अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन मोठ्या कारवाया करत 96 किलो 87 ग्रॅम गांजा, एक कार, दोन रुग्णवाहिका, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण एक कोटी 31 लाख 55 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा विक्री करणारे आणि खरेदी करणारे अशा सर्व आरोपींना अटक करून अमली पदार्थ विरोधी पथकाने ही साखळी नष्ट केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडिक, पोलीस अंमलदार बाळासाहेब सूर्यवंशी, जिलानी मोमीन, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, मनोज राठोड, संतोष भालेराव, अनिता यादव, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अजित कुटे, प्रसाद जंगीलवाड, रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रुद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे, पांडुरंग फुंदे यांनी केली आहे.