Home Breaking News “डिजिटल युगातील नायक!” डॉ. धनंजय देशपांडे यांना ‘द डिजिटल हिरो नॅशनल अवॉर्ड...

“डिजिटल युगातील नायक!” डॉ. धनंजय देशपांडे यांना ‘द डिजिटल हिरो नॅशनल अवॉर्ड 2025’ प्रदान; सायबर जागृतीच्या क्षेत्रात मोठं योगदान

सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात जनजागृती घडवून आणणारे, लोकांमध्ये डिजिटल सजगता निर्माण करणारे आणि सायबर अवेयरनेस चळवळीला देशभर पोहोचवणारे, डॉ. धनंजय देशपांडे यांना नुकताच ‘द डिजिटल हिरो नॅशनल अवॉर्ड 2025’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धुळे येथे सायबर अवेयरनेस फाउंडेशन, ग्लोबल युनिव्हर्सिटी आणि सायबर क्लोक डिजिटल लीगल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा गौरव प्रदान करण्यात आला. या पुरस्काराची घोषणा निवेदिकेने करताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमले. “And the Digital Hero National Award 2025 goes to… Dr. Dhananjay Deshpande” हे शब्द ऐकताना डॉ. देशपांडे भावविवश झाले.

वैयक्तिक प्रवास ते सामाजिक समर्पण:
डॉ. देशपांडे यांनी सुरुवातीस सायबर इन्वेस्टीगेशनमध्ये काम केले. मात्र त्यांनी लवकरच जाणले की, एखाद्या प्रकरणाचा तपास पूर्ण करायला २-३ दिवस लागतात, परंतु त्याच कालावधीत ते हजारोंना सायबर धोके आणि त्यावरील उपाय सांगून सजग करू शकतात. याच विचारातून त्यांनी स्वतःला पूर्णतः सायबर अवेयरनेस क्षेत्रात झोकून दिले.

“आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजारीच न पडण्यासाठी उपाय करणं जास्त महत्त्वाचं,” हे त्यांचं ब्रीदवाक्य ठरलं. ‘सायबर क्राईमचा धोका – वेळीच ओळखा’ या नावाने सुरू झालेली व्याख्यानमाला आता १५० पेक्षा अधिक व्याख्यानांची झाली असून सुमारे १.७५ लाख नागरिकांपर्यंत ही जागृती पोहोचवण्यात आली आहे.

सामाजिक व्याप्ती आणि लोकमान्यता:


या व्याख्यानांचे आयोजन केवळ लहान क्लबसाठीच नव्हे, तर कोर्डियेला क्रूझवर ४ हजारहून अधिक लोकांसाठीही करण्यात आले. हे व्याख्यान ऐकणाऱ्यांपैकी निम्मे लोक सायबर सजग झाले, तरी तेच डॉ. देशपांडेंना सर्वात मोठा पुरस्कार वाटतो.

गौरवाची मालिका:
या आधीही डॉ. देशपांडे यांना १५० हून अधिक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून, हा १५१ वा पुरस्कार त्यांच्या साठाव्या वाढदिवशी मिळणं हा अनोखा योगायोग ठरला. निवेदिकेने याची घोषणा करताच सभागृहातील प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांनी आणि “स्टँडिंग ओव्हेशन” देऊन त्यांचा सन्मान केला.

गुरु स्मरण आणि प्रेरणा:
स्व. मंगेश तेंडुलकर यांचे शब्द, “या ट्रॉफीज नव्हे, प्रवासातील मैलाचे दगड आहेत”, हे डॉ. देशपांडेंना कायम प्रेरणा देत आले आहेत. त्यामुळे आजवर कितीही गौरव मिळाले तरी पुढच्या प्रवासासाठी ते नेहमी सज्ज असतात.

पोलीस अधिकाऱ्याची खास दाद:
कार्यक्रमानंतर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने डॉ. देशपांडे यांच्याकडे येऊन खास शब्दांत शुभेच्छा दिल्या –
“दुवा आहात…. दुआओं में याद रखना!”
म्हणजे नागरिक आणि पोलिस यांच्यातील पूल निर्माण करणारे तुम्ही आहात, अशी खास ओळख त्यांना मिळाली.

 त्यांच्या भूमिकांमध्ये:

  • HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

  • Mentor: Transcendental-Technologies

  • Association with Pune University (SPPU), Canada आणि UK मधील सायबर सुरक्षा संस्थांशी संबंध