Home Breaking News “सन्मान स्त्री शक्तीचा” सोहळ्यात १५ हजार महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती!

“सन्मान स्त्री शक्तीचा” सोहळ्यात १५ हजार महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती!

92
0
पुणे : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा भव्य सत्कार सोहळा “सन्मान स्त्री शक्तीचा” कसबा मतदारसंघात मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास तब्बल १५ हजारांहून अधिक महिलांनी उपस्थिती लावली, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून गेल्या १० वर्षांपासून अखंडपणे आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाला यंदाही महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
🛑 स्त्रीशक्तीचा गौरव – समाजातील आदर्श महिलांचा सन्मान!
भाजपच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या हस्ते समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव योगिता भोसले, खो-खो संघ प्रशिक्षिका प्राची वाईकर, पत्रकार मीनाक्षी गुरव, समाजसेविका शर्मिला सय्यद, साहित्य क्षेत्रातील वसुंधरा काशीकर आणि आंतरराष्ट्रीय नृत्यांगना वैष्णवी पाटील यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आले.
🎉 हळदी-कुंकू समारंभास हजारोंचा प्रतिसाद!
केवळ पुरस्कार सोहळाच नव्हे, तर पारंपरिक हळदी-कुंकू समारंभातही महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सामाजिक एकजूट आणि स्त्रीशक्तीला प्रेरणा मिळावी, हा उद्देश ठेवून हा उपक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
🔹 आमदार हेमंत रासने यांचे मार्गदर्शन
यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “अनादी काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्ती आणि देवीचे रूप मानले जाते. आजच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्या प्रत्येक क्षेत्रात सक्षमतेने कार्यरत आहेत आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, उमेश अण्णा चव्हाण, वैशालीताई नाईक, राणीताई कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष निलेश कदम यांनी परिश्रम घेतले.