पुण्याजवळ देशातील पहिलं ‘ADAS टेस्ट सिटी’ उद्घाटित; भारतीय वाहन सुरक्षा क्षेत्राला मोठी गती
पुणे – भारताच्या वाहन सुरक्षा क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. देशातील पहिलं स्वतंत्र ‘Advanced Driver Assistance Systems (ADAS) टेस्ट सिटी’ पुण्याजवळील तळेगाव-ताके येथे अधिकृतरीत्या उद्घाटित करण्यात आलं. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांच्या पुढाकाराने उभारलेलं हे अत्याधुनिक केंद्र ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आलं. ही टेस्ट सिटी तब्बल २० एकरांवर पसरलेली असून, भारतीय...
महालुंगे MIDC परिसरात भीषण अपघात; टेम्पो–रिक्षा धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
पिंपरी-चिंचवड | खेड तालुका – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील खेड तालुक्यातील महालुंगे MIDC परिसरात गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. प्रवासी रिक्षा आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने रिक्षा अक्षरशः चेंदामेंदा झाली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की रिक्षा लोखंडाच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाली. घटनेची...
“पुणेकरांचा जनसहभाग अनोखा! मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या संकल्पानिमित्त ३०,३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन”
पुणे शहराने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श समोर ठेवत इतिहास रचला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या संकल्पापोटी आयोजित ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३०,३३८ रक्तपिशव्यांचे संकलन करून नवा विक्रम केला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुणे शहरातील ५६ रक्तदान शिबिरांचे जाळे उभे करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांमध्ये युवापिढीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून...
पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन; सामाजिक न्यायाच्या विचारांना नव्याने सलाम
पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा सामाजिक क्रांतीचा वारसा आजही देशभरातील जनतेला प्रेरित करत असल्याचे यावेळी नेत्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जुलै २०२५ अखेर अधिकारी,कर्मचारी असे एकूण ३८ जण सेवानिवृत्त…
पिंपरी, दि. २ ऑगस्ट :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे आपले सहकारी अधिकारी,कर्मचारी हे पुढील जीवनात वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार आहेत. त्यांची जबाबदारीने कामकाज करण्याची पध्दत,सेवाभाव आणि त्यांच्या आठवणी सेवानिवृत्तीनंतरही कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,पिंपरी...
प्रशिक्षक विवेक मालशे यांचे यश अभिमानास्पद – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
पिंपरी : नवी दिल्ली येथे इंडीयन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) तर्फे ९ व्या टी-२० राष्ट्रीय डेफ क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र मूकबधिर क्रिकेट संघाने जम्मू काश्मीर मूकबधिर क्रिकेट संघाचा ८ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल विवेक मालशे मोलाचा वाट उचलला. या स्पर्धेत प्रशिक्षक या नात्याने...
मुंबईकरांनो लक्ष द्या! तीन दिवसांत 517 ई-बाइक्स जप्त; ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई सुरू
मुंबई : महानगरातील वाढती वाहतूककोंडी, बेफिकीर ड्रायव्हिंग आणि नियमभंग करणाऱ्या ई-बाइक रायडर्समुळे त्रस्त झालेल्या मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका लावला आहे. फक्त तीन दिवसांत तब्बल 671 प्रकरणांवर गुन्हे नोंदवून 517 ई-बाइक्स जप्त केल्या आहेत. या कारवाईने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ट्रॅफिक पोलीसांनी हे स्पष्ट केले आहे की, शहरात बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या ई-बाइक्स, परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक, हेल्मेट...
श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासाला नवी दिशा; भव्य आणि शाश्वत आराखड्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार
मुंबई : मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या Tulja Bhavani Temple विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची देण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री Pratap Sarnaik यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला. संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास केवळ तात्पुरत्या गरजांसाठी...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…
पिंपरी, १२ फेब्रुवारी २०२६ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्यासह ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहीरी कार्यक्रम’,...
महिला सशक्तीकरणासाठी ठाम भूमिका! राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध
मुंबई :- राज्यातील महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी दृढ संकल्प केला असून, विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेपासून त्यांच्या आर्थिक सबलीकरणापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ठोस पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महिलांसाठी ठोस योजना – तक्रार केल्यावर तत्काळ कारवाई महिलांवरील अन्याय, हिंसाचार आणि शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, मंत्री कु. आदिती...









