Breaking News
अफू आणि दोडा चुरासह मोठा अंमली पदार्थ साठा हस्तगत; कोंढवा पोलिसांची कारवाई
कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अफू आणि दोडा चुरासह एक इसम जेरबंद केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे पुणे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला मोठा धक्का बसला आहे. यश कॉम्प्लेक्ससमोर, कामठे पाटील नगर, येवलेवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक संशयित इसम दिसून आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अफू...
सुनीता विल्यम्स 286 दिवसांनंतर सुखरूप पृथ्वीवर परतल्या; इतिहासात नवा अध्याय
नासाच्या सुप्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 286 दिवसांच्या प्रदीर्घ अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या 'ड्रॅगन' यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत. महत्त्वाचा प्रवास आणि संशोधनाची कामगिरी सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ...
नोकरीवरून काढून टाकल्याचा राग; चिंचवडमध्ये सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला! घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पिंपरी-चिंचवड | २१ जून २०२५ :- पिंपरी चिंचवडमधील चिंचवड गावातील शांतीबन सोसायटीमध्ये एका सुरक्षा रक्षकावर थरारक चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदाम कामिठे (वय अंदाजे ५०) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव असून, राम लोंढे नावाच्या इसमाने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘कसा घुसतोस?’ विचारल्यावर संतापला, थेट चाकूने हल्ला राम लोंढे नावाचा आरोपी शांतीबन सोसायटीमध्ये जबरदस्तीने प्रवेश...
विधानभवनात चिघळले वातावरण! भाजपा-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी; गोंधळावर राजकीय नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान एक अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद प्रकार घडला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका चिघळला की थेट मारहाणीत रूपांतर झाले. यामध्ये पडळकर गटाचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाड यांच्या गटाचे नितीन देशमुख यांच्यात धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची माहिती...
पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग
पुणे : दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने "पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव" दिमाखदार पद्धतीने पार पडला. दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम , ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले. त्यांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती – अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब...
“सीबीआय, कस्टम्स, नार्कोटिक्स, आणि आयकर अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या बनावट टोळीने एचडीएफसी खात्यातून ₹ ८५ लाखांची लूट केली.”
नवी दिल्ली: सीबीआय, कस्टम्स, नार्कोटिक्स, आणि आयकर अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या टोळीने एक निवृत्त वरिष्ठ कार्यकारी यांच्याकडून स्काईपवर ₹ ८५ लाख उकळले. हा फसवणुकीचा प्रकार आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये आणि दिल्लीमध्ये घडला आहे. विशाखापट्टणम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दिल्लीमध्येही तक्रार नोंदवली आहे. टोळीने धनादेशाद्वारे पैसे घेतले आणि ते 'राणा गारमेंट्स' नावाच्या कंपनीला हस्तांतरित केले, जी दिल्लीच्या उत्तम नगरमधील एचडीएफसी खात्याचे संचालन...
‘सहकार टॅक्सी’ – चालकांसाठी नवा आर्थिक आधार! सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली - सरकारने ओला, उबरसारख्या व्यावसायिक राईड-शेअरिंग सेवांना पर्याय म्हणून ‘सहकार टॅक्सी’ ही नवीन योजना जाहीर केली आहे. या नव्या योजनेमुळे चालकांना त्यांच्या कमाईतून अधिक नफा मिळेल आणि टॅक्सी व्यवसायात मोठा बदल घडून येईल. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो टॅक्सीचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. ‘सहकार टॅक्सी’मुळे चालकांना थेट फायदा ओला-उबरच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना आतापर्यंत त्यांच्या कमाईचा मोठा...
ठाण्यातील हादरवणारी घटना: तीन वर्षीय पुतणीची हत्या, नातेवाईकांकडून मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत उलगसनगरमध्ये फेकला; आरोपीला अटक.
ठाणे: पुतणीच्या अनवधानाने झालेल्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; नातेवाईक अटकेत उल्हासनगरमधील प्रेमनगर टेकडी परिसरात एका तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या मामाला अटक केली असून, त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, त्याने हा प्रकार अनवधानाने घडल्याचा दावा केला आहे. मुलीचे बेपत्ता होणे आणि मृतदेहाचा शोध: नोव्हेंबर 18 रोजी मुलीच्या आईने, जी...
पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार हरपले; अजित पवारांच्या निधनाने उद्योगनगरी पोरकी झाल्याची तीव्र भावना
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे, शहराला आधुनिकतेची दिशा देणारे आणि “बारामती माझी जन्मभूमी, पिंपरी-चिंचवड माझी कर्मभूमी” असे अभिमानाने सांगणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण उद्योगनगरी शोकसागरात बुडाली आहे. शहराच्या रस्त्यांपासून ते रुग्णालयांपर्यंत, पाण्यापासून ते सार्वजनिक वाहतुकीपर्यंत—अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घडलेला विकास आज प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे. १९९१–९२ च्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून राजकीय वाटचाल...
महाराष्ट्रातील वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसवण्यासाठी ३१ मार्च २०२५ अंतिम मुदत; २ कोटी वाहनधारकांसाठी नवी अट.
मुंबई: महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनचोरी रोखणे व वाहनांची ओळख सुसंगत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सुमारे दोन कोटी वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली असून, यानंतर अटींचे पालन न करणाऱ्या वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. तांत्रिक वैशिष्ट्ये व महत्त्व: हाय...














