पुणे : दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने “पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव” दिमाखदार पद्धतीने पार पडला.
दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम
, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले. त्यांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती – अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब रंगारी व श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे दर्शन घेतले.






