Breaking News
“संभाजीनगर रस्त्यावर पांढरी पुलाच्या घाटात आज सकाळी ट्रक उलटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.”
संभाजीनगर रस्त्यावरील पांढरी पुलाच्या घाटात ट्रक उलटला, अपघात झाल्याने १ ठार तर एकजण जखमी.व्हिडिओ. (Ghodegaon pandri bridge sambhaji nagar Highway) संभाजीनगर रस्त्यावर पांढरी पुलाच्या घाटात घडलेल्या या भीषण अपघाताने एकजण आपला जीव गमावला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे ट्रकचालकांनी अधिक सतर्कतेने वाहन चालविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
‘वाईल्ड ताडोबा’ ट्रेलरचे शानदार अनावरण! CM फडणवीस यांच्याहस्ते सुब्बीया नल्लामुथु यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
मुंबई, मंत्रालय | दिनांक - २९ जुलै २०२५ | वेळ - दु. २ वा. वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'वाईल्ड ताडोबा' या आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा ट्रेलर मंत्रालायात भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या माहितीपटातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक सौंदर्य, व्याघ्रांचे जीवन आणि जंगलातील जैवविविधतेचा थरारक आढावा घेतला गेला आहे. या सोहळ्यात जागतिक दर्जाचे दिग्दर्शक, निर्माता आणि...
मुंबई: पोलीस शिपायाने पोस्टल मतदार चिठ्ठीचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले; निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला धक्का.
मुंबई : निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेला धक्का देणाऱ्या एका प्रकरणात, मुंबईतील एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक शस्त्र पोलीस विभागातील पोलीस शिपाई गणेश शिंदे याने पोस्टल मतदार चिठ्ठीचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपशील: गणेश शिंदे, बीड जिल्ह्यातील अस्ती मतदारसंघाचा मतदार असून, मुंबईतील ताडदेव येथील...
उल्हासनगरमधील लॉजवर कळवा गुन्हे शाखेचा छापा; अनैतिक संबंध प्रकरणी दहा जणांना अटक
उल्हासनगर (ठाणे) – शहरातील शुभम लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग येथे अनैतिक कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर कळवा गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत चार पुरुष आणि सहा महिलांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लॉज व्यवस्थापक, वेटर व ग्राहकांना अटक अटक करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये लॉजचा व्यवस्थापक, एक वेटर आणि लॉजमध्ये आलेले ग्राहक यांचा समावेश...
नवी मुंबईचा अभिमान, स्वप्नांचा नवा केंद्रबिंदू! ‘आता संपूर्ण मुंबई नवी मुंबईकडे येणार’ – सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया
नवी मुंबई | प्रतिनिधी — “Congratulations all Navi Mumbaikars. अख्खी मुंबई आता तुमच्याकडे येणार आहे…” अशा शब्दांत नवी मुंबईकरांनी सोशल मीडियावर आनंद, अभिमान आणि आत्मविश्वास व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रारंभानंतर नवी मुंबईचे महत्त्व केवळ वाढले नसून, तिची ओळखच बदलून गेली आहे. एकेकाळी पश्चिम आणि मध्य उपनगरांतील (तर दक्षिण मुंबईचा उल्लेख न करताच) काही लोकांकडून नवी मुंबईकडे दुर्लक्ष...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विवध कार्यक्रमांचे आयोजन..
पिंपरी, दि. ०२ जानेवारी २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध...
पुणे पोलिसांची मोठी कारवाई – अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १६.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | शहरात अंमली पदार्थांच्या साखळीविरोधात मोठी कारवाई करत पुणे पोलिसांनी एक मोठी टोळी जेरबंद केली आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरात सापळा रचून एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांची माहिती व १६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल उघडकीस आला आहे. स्वारगेट येथे संशयिताची बॅग तपासली असता गांजा आढळला दि. १९ जून २०२५ रोजी, पोलीस अंमलदार राहुल...
मुंबईत भीषण अपघात : फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा BEST बसखाली येऊन मृत्यू
मुंबई : मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सार्थक जंगम या युवकाचा BEST बसखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अप्पासाहेब मराठे रोडवर ही दुर्घटना घडली. सार्थक जंगम, वय २१, वांद्रे (पश्चिम) येथील सहकारी भंडार येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अपघाताच्या वेळी तो एका डिलिव्हरी कॉलवर जात असताना दुर्दैवीरित्या...
“गंगाधाम चौकात वेगाने येणाऱ्या ट्रकने महिलेला चिरडले; अवजड वाहनांच्या बेकायदेशीर वाहतुकीकडे प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष!”
पुणे: काल (१२ जून) पुणे मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथे एक भयानक अपघात झाला. एका महिलेला वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही, हे ट्रक, मिक्सर इत्यादी खडतर उतारावरून येतच असतात. वाहतूक पोलिसांकडून हे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष केले जाते. राजकारणी आणि लोकप्रतिनिधी पोलिसांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास...
पीएम किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय!
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज बिहारच्या भागलपूर येथून ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा १९ वा हप्ता जारी करत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात २२ हजार कोटी रुपये थेट जमा केले. केवळ एका क्लिकवर हा मोठा आर्थिक सहाय्याचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक दिवस! मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी...












