पुणे: काल (१२ जून) पुणे मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथे एक भयानक अपघात झाला. एका महिलेला वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आहे. तरीही, हे ट्रक, मिक्सर इत्यादी खडतर उतारावरून येतच असतात. वाहतूक पोलिसांकडून हे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले जाते. राजकारणी आणि लोकप्रतिनिधी पोलिसांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास दबाव आणतात. या उदासीनतेमुळे एका महिलेचा बळी गेला आहे.


पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात बुधवारी दुपारी वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव दयामती सोलंकी (५८) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलंकी आपल्या सुनेसोबत दुपारी १ वाजता आई माता मंदिर चौकातून गंगाधाम चौकाकडे जात असताना वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. सोलंकी पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली त्यांचे डोके आल्याने त्यांचा तात्काळ मृत्यू झाला. सून जखमी झाली असून तिला शासकीय ससून सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





