तिरुवनंतपुरम: मुंबई-तिरुवनंतपुरम एअर इंडियाच्या विमानाच्या स्वच्छतागृहातील टिश्यू पेपरवर गुरुवारी बॉम्बची धमकी लिहिलेली आढळली. या धोक्यामुळे पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली. पोलिसांनी आता तपासाची जबाबदारी स्वीकारली आहे.
प्राथमिक तपासात ही धमकी फक्त खोडसाळपणाने दिल्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की, ही धमकी प्रवाशांपैकी कोणीतरीच दिली असावी. त्यामुळे सर्व १३५ प्रवाशांची चौकशी केली जाणार आहे, आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे सामान परत देण्यात येणार नाही. सध्या तपासणीदरम्यान कोणताही बॉम्ब सापडलेला नाही. मुंबईहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तिरुवनंतपुरम विमानतळावर या विमानाची तातडीने लँडिंग सकाळी ८.०० वाजता झाली. हे विमान मुंबईहून गुरुवारी सकाळी ५.४५ वाजता उड्डाणासाठी निघाले होते, आणि मूळ वेळेनुसार सकाळी ८.१० वाजता लँड होणार होते, परंतु ते १० मिनिटे आधी लँड झाले.