पुणे : पुणे शहरातील नागरिकांचा उत्सव आनंदी, सुरक्षित आणि शांततेत पार पाडावा यासाठी पोलिसांनी कडेकोट तयारी केली आहे. गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दंगा काबू योजना व रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
ही मोहीम २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.५५ ते ११.४० या वेळेत पार पडली. या रूट मार्चचे मार्गदर्शन मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले. तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.
रूट मार्च हडपसर गाडीतळ – गांधी चौक – राम मंदिर – पांढरे मळा – नालबंद मस्जिद – मंत्री मार्केट – हडपसर भाजी मंडई मार्गे परत गांधी चौक व हडपसर पोलीस स्टेशन येथे संपन्न झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनाही शांतता, एकोपा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवाहन करण्यात आले.
दंगा काबू योजनेंतर्गत पोलिसांनी उपलब्ध साधनसामग्रीची माहीती दिली व कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलीस दल पूर्ण सज्ज असल्याचा विश्वास नागरिकांना दिला. हडपसर परिसरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा हा रूट मार्च काढल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली.
🔹 नागरिकांचा विश्वास, पोलिसांची तयारी, पुणे शहर उत्सवासाठी सज्ज!