पुणे शहरात वाढत असलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी पुणे पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत हडपसर पोलीस स्टेशनने तब्बल ५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत ३,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन वेगवेगळ्या तपासांत मुख्य आरोपी व एक विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या विशेष सूचनांनुसार हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले यांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. या पथकाने विविध भागांमध्ये गस्ती, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीचा वापर आणि सखोल तपास करत वाहनचोरीचा गुंता उकलण्यास यश मिळवले.
मुख्य आरोपी रविंद्र शिवाजी घाटे ताब्यात
गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने बार्शी, तुळजापूर आणि लातूर परिसरात विशेष शोध मोहीम राबवली. यामध्ये रविंद्र शिवाजी घाटे (वय ४०, रा. दहीवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीवर हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ८०७/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३ (२) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
स्वतंत्र तपासात विधीसंघर्षित बालक ताब्यात
दुसऱ्या तपासात पोलिसांनी एक विधीसंघर्षित बालक यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आणखी १ दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
५ दुचाकींसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
या संपूर्ण कारवाईत एकूण ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात –
-
१ बुलेट
-
२ होंडा शाईन
-
२ टीव्हीएस रायडर
जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत ₹३,३०,००० इतकी आहे.
उत्कृष्ट समन्वय आणि पोलिसांची संयुक्त कामगिरी
ही कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली –
-
मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग – श्री. मनोज पाटील
-
मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ – श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर
-
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर – श्रीमती अनुराधा उदमले
तपास पथकाचे नेतृत्व –
-
पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी
-
पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड






